SIDBI  sakal media
अर्थविश्व

समाजोपयोगी उद्योजकतेला प्रोत्साहन, सिडबीतर्फे स्वावलंबन चॅलेंज फंड योजना सुरु

कृष्ण जोशी

मुंबई : समाजाला उपयुक्त ठरणारी (people benefited) उद्योजकता केवळ पैशांअभावी मागे पडू नये म्हणून सिडबीतर्फे स्वावलंबन चॅलेंज फंड (SIDBI fund scheme ) ही आगळीवेगळी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेनुसार विशिष्ठ बाबींसाठीच हा निधी दिला जाईल. ना नफा तत्वावर काम करणाऱ्या संघटना, शैक्षणिक संस्था, सामाजिक स्टार्टअप आदींना यातून अर्थसाह्य (finance help) केले जाईल. इंग्लंडमधील (England) फॉरेन कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट (FCD) ऑफिसच्या साह्याने ही योजना राबविली जाईल.

एखादी चांगली उद्योजकतेची कल्पना जर निधीअभावी मागे पडत असेल तर यांना सुरुवातीला यो योजनेतून साह्य केले जाईल. त्यानंतर मोठे भांडवल मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील. सामान्यांची उपजिविका, महिला सक्षमीकरण, अर्थसाक्षरता, सामाजिक उत्तरदायित्व जपणारे उद्योग आदींना यात प्राधान्य मिळेल.

या पायलट आणि स्केलअप अशा दोन प्रकारातील उद्योजकांना अर्ज करता येतील. पायलट प्रकारातील उद्योजक आपल्या नवकल्पना सर्वांसमोर मांडण्यासाठी किंवा त्याच्या चाचणीसाठी अर्ज करू शकतील. तर यापूर्वीच सुरु असलेले किंवा पूर्ण झालेले, या प्रकारचे उद्योग आपली व्याप्ती वाढविण्यासाठी स्केलअप प्रकारात अर्ज करू शकतील. पायलट प्रकारातील उद्योगासाठी वीस लाख तर स्केलअप गटासाठी 35 लाख रुपये मिळतील. या दोनही गटांसाठी 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. दोनही गटांमध्ये निवडण्यात येणारी अर्जांची संख्या पाहून या योजनेखाली किती निधी द्यायचा हे निश्चित केले जाईल. निधीचा विनियोग करण्याचा कालावधी सहा महिने ते दोन वर्षे राहील, असे सिडबी चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमणियन रामन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT