अर्थविश्व

फक्त 200 रुपयांची बचत करा, 18व्या वर्षी मुलाच्या अकाऊंटमध्ये असतील 20 लाख

सुमित बागुल

Saving tips for children: सध्याच्या घडीला मुलांचे 'फ्यूचर प्‍लानिंग' त्यांच्या जन्मापासूनच सुरु करणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणत्याही रिस्कशिवाय मुलांच्या नावे पैसे जमा करायचे आहेत का? जे त्याला 18 वर्षांचा झाल्यास उच्च शिक्षणासाठी उपयोगी पडतील तर तुमच्यासाठी पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) अकाउंट चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावे (PPF) अकाउंट सुरु करु शकता, ज्याचा फायदा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी होईल. पण जर तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांचे झाल्यास पीपीएफ अकाउंट सुरु करताय तर पुढे 15 वर्ष वाट बघायला लागेल. त्यामुळे जेवढा लवकर पीपीएफ अकाउंट सुरु कराल तेवढेच त्यांच्या भविष्याबाबत तुम्ही निश्चिंत राहाल.

PPF अकाउंटचे फायदे

पोस्‍ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत तुम्ही तुमच्या चिमुकल्याच्या नावे PPF अकाउंट ओपन करु शकता. पीपीएफ अकाउंटचा लॉक इन पीरियड 15 वर्षांचा असतो. जर तुम्ही मुलाचे वय 3 किंवा 4 असताना पीपीएफ अकाउंट सुरु केले तर तो किंवा ती 18 - 19 वर्षांचे झाल्यास हे अकाउंट मॅच्युअर होईल. तुमचा मुलगा किंवा मुलगी स्वतः हे अकाऊंट मॅनेज करु शकतील पुढे हे अकाउंट सुरु ठेवायचे असेल तर ते 5-5 वर्ष टेन्‍युअरमध्ये ठेवता येऊ शकेल.

200 रुपये रोजच्या बचतीने होतील 20 लाख

PPF स्कीमच्या अंतर्गत फक्त 200 रुपये रोज बचत केल्यास दरमहिना 6,000 होतात. हे पैसे तुम्ही पीपीएफ अकाउंटमध्ये भरलवल्या वर्षाचे 72,000 होतात, असे 15 वर्ष पैसे भरायचे. त्याची एकूण रक्कम 10,80,000 रुपये इतकी होते. PPF मध्ये आता वार्षिक 7.1 टक्के कंपाउंडिंग व्याज मिळते. 15 वर्षांचे व्याज जोडल्यास एकूण रक्कम 19,52,740 लाख होते. म्हणजेच एकूण गुंतवणुकीवर तुम्हाला 8,72,740 रुपये व्याज मिळते.

फक्त 500 रुपयांनी सुरु करु शकता अकाउंट

एक आर्थिक वर्षांत कमीतकमी 500 रुपये गुंतवणूक गरजेची आहे. एका वर्षांत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. पीपीएफ स्कीममध्ये तुमची गुंतवणूक अतिशय सुरक्षित आहे, शिवाय तुम्हाला टॅक्‍स सूटीचा फायदाही मिळतो. पीपीएफ स्कीममध्ये गुंतवणुकीवर
डिडक्‍शनसोबतच मॅच्‍युरिटीची अमाउंट आणि व्याजावरही कोणताही टॅक्स लागत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT