Sakal (15).jpg
Sakal (15).jpg 
अर्थविश्व

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; होमलोनसाठी एसबीआयची ऑफर  

सकाळ ऑनलाईन टीम

नवीन वर्षात घर खरेदी करणाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठ्या बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाने खुशखबर दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गृह कर्जात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गृह कर्जाचे दर 30 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.3 टक्क्यांनी कमी केले आहेत. याशिवाय प्रोसेसिंग फी देखील माफ करण्याची घोषणा एसबीआयने केली आहे. हा व्याज दर आठ मोठ्या शहरांमध्ये गृह कर्जासाठीही उपलब्ध होणार आहे. आणि हा व्याज दार पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर राहणार असल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे. 

स्टेट बँकेने जारी केलेल्या निवेदनात गृह कर्जावरील नवीन व्याज दर सिबिल स्कोरशी जोडले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आणि हे व्याज दर 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 6.80 टक्के, तर 30 लाख रुपयांपेक्षा कर्जावर 6.95 टक्के व्याज दर राहणार आहे. याव्यतिरिक्त, महिला कर्जदारांना 0.05 टक्के अतिरिक्त सूट मिळणार असल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे. 

पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी आठ महानगरांमध्ये देखील 0.30 टक्क्यांपर्यंत व्याज सवलत उपलब्ध राहणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. व यासाठी  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिजिटल योनो ऍप वरून देखील अर्ज करता येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.   


  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT