Home Sakal.jpg 
अर्थविश्व

तुम्ही थेट SBI कडूनच खेरेदी करु शकता स्वस्तात मस्त घर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ डिजिटल टीम

माणसाच्या आयुष्यातील तीन मूलभूत गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यामुळे सर्वांनाच कधी ना कधी आपले स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते. आणि त्यासाठीच तो दररोजच्या धकाधकीच्या जीवनात धडपडत असतो. त्यातच मोठ मोठ्या शहरांमध्ये घराच्या किमती आकाशाला भिडल्या असल्यामुळे प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मात्र जर आपणाला देखील स्वतःचे घर स्वस्तात घ्यायचे असेल ते सत्यात उतरू शकते. कारण बाजारपेठेपेक्षा कमी किंमतीत घर, दुकान किंवा औद्योगिक मालमत्ता खरेदी करायची असेल तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) तुम्हाला संधी देत ​​आहे. व ही संधी यावर्षीच्या अखेरपर्यंतच असणार आहे. त्यामुळे एसबीआयच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्ही देखील हवी असलेली मालमत्ता खरेदी करू शकता. 

एसबीआय ही काही कारणास्तव कर्ज परतफेड करू न शकलेल्या ग्राहकांच्या संपत्तीचा लिलाव करणार आहे. आणि या लिलावात निवासी घरांपासून, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या मालमत्तांचा समावेश असणार आहे. एसबीआयच्या ग्राहकांनी घेतलेले कर्ज काही कारणामुळे परतफेड केलेले नसल्यामुळे अशी संपत्ती बँकेने आपल्या ताब्यात घेतलेली आहे. आणि या संपत्तीची विक्री बँक ई-लिलावाद्वारे करणार आहे. घेतलेले कर्ज न फेडलेल्या ग्राहकांची ही मालमत्ता बँकेकडे तारण आहे. आणि या संपत्तीची विक्री करून बँक आपले अडकलेले पैसे परत मिळवणार आहे. 

देशातील एसबीआय बँकेने या लिलावाची माहिती सोशल मीडियाच्या ट्विटर वरून दिलेली आहे. बॅंकेने ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, ई-लिलाव योजनेंतर्गत लिलावात भाग घेण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. तसेच या लिलावातून देशाच्या कोणत्याही ठिकाणी मालमत्ता खरेदी करता येणार आहे.  तसेच या लिलावात इच्छुक खरेदीदारास मालमत्तेविषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार असल्याचे बँकेने नमूद केले आहे. याव्यतिरिक्त लिलावात भाग घेण्यापूर्वी संबंधित इच्छुक खरेदीदारास मालमत्तेचे आकार, स्थान व इतर माहिती बॅंकेकडून मिळवता येणार आहे. 

एसबीआय येत्या 6 दिवसांत 758 निवासी, 251 व्यावसायिक आणि 98 औद्योगिक मालमत्तांचा लिलाव करणार आहे. तर पुढील 30 दिवसांत 3032 निवासी, 844 व्यावसायिक आणि 410 औद्योगिक मालमत्तांचा लिलाव करणार असल्याचे बँकेने सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला देखील या लिलावात सहभागी व्हायचे असल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरून नोंदणी करावी लागणार आहे. तसेच जवळच्या बँक शाखेत केवायसी डॉक्युमेंट्स सादर करावे लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT