Share Market
Share Market sakal
अर्थविश्व

Stock Market Investment : 'या' स्टॉकने गेल्या दोन वर्षात दिला तिप्पट रिटर्न...

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांन दमदार परतावा दिला आहे. शेअर बाजारात संयम राखणं ही सगळ्यात मोठी गुरुकिल्ली असल्याचे शेअर बाजार तज्ज्ञ कायम सांगत असतात. मजबूत फंडामेटल्स असणाऱ्या शेअर्समध्ये लाँग टर्मसाठी पैसे गुंतवण्याचा सल्ला अनेकदा एक्सपर्टस देत असतात. कारण यातच तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबाबत सांगणार आहोत, ज्याने लाँग टर्ममध्ये आपल्या गुंतवणुकदारांना कधीही निराश केलं नाही. शिवाय या शेअरमधील तेजी येत्या काळात वाढतच जाणार आहे.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

आम्ही सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड (SIL) या स्टॉकबाबत बोलत आहोत. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या दोन वर्षात गुंतवणूकदारांना 300 टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे. सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड ही विविध प्रकारच्या स्फोटकांची उत्पादक कंपनी आहे. ही स्फोटकं खाणकाम, पायाभूत सुविधा आणि बांधकाम उद्योगांमध्ये वापरले जातात. दुसरीकडे, संरक्षण क्षेत्रात, कंपनी यूएएस आणि ड्रोन, दारूगोळा, लष्करी स्फोटके, बॉम्ब आणि शस्त्रे, काउंटर-ड्रोन सिस्टम (CDS) इत्यादींचे उत्पादन करते.

गुरुवारी सोलर इंडस्ट्रीजचे शेअर्स 4020.85 रुपयांवर व्यवहार करत होते. गेल्या दोन वर्षांच्या हे शेअर्स 300 टक्क्यांनी वाढले आहेत. 3 डिसेंबर 2020 रोजी शेअर 1054.81 रुपयांवर होते. बीएसईवर या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 4,269.40 रुपये आणि निचांक 2,160.05 रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT