stock market Latest News
stock market Latest News stock market Latest News
अर्थविश्व

Stock Market : सेन्सेक्स ५५,८१६ तर निफ्टी १६,६४२ वर बंद; दोन दिवसांनी वाढ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात (Stock Market) चांगली वाढ पाहायला मिळाली. बुधवारी (ता. २७) सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झालेत. मात्र, सोमवारी आणि मंगळवारी बाजारात घसरण दिसून आली होती. आजच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ५४७.८३ अंकांनी म्हणजेच ०.९९ टक्क्यांनी वाढून ५५,८१६.३२ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) निर्देशांक १५७.९५ अंकांनी म्हणजे ०.९६ टक्क्यांनी वाढून १६,६४१.८० वर बंद झाला. (stock market Latest News)

आज सेन्सेक्सच्या (Sensex) टॉप-३० पैकी ५ समभागांची (स्टॉक्स) विक्री झाली आहे. तर भारती एअरटेलचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहे. याशिवाय कोटक बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह आणि रिलायन्सचे समभाग घसरले आहेत. याशिवाय तेजीच्या समभागांच्या यादीत २५ समभाग आहेत. आजचा टॉप गेनर शेअर सन फार्माचा आहे.

एसबीआय, एलटी, एशियन पेंट्स, टीसीएस, अल्ट्राकेमिकल, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, डॉ रेड्डी, ॲक्सिस बँक, मारुती, एचसीएल टेक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, विप्रो, आयटीसी, नेस्ले इंडिया आणि टायटनसह अनेक समभाग वधारले आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचे तर आज सर्व क्षेत्र हिरव्या चिन्हात बंद झालेत. निफ्टी बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, प्रायव्हेट बँक, रियल्टी, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्येही चांगली खरेदी झाली आहे.

सन फार्मा सर्वाधिक ३.३९ टक्क्यांनी वाढला

दोन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी बेंचमार्क निर्देशांक परत आले. आयटी आणि बँक समभागातील खरेदीमुळेही इक्विटीमध्ये रिकव्हरी झाली. सेन्सेक्स पॅकमध्ये सन फार्मा सर्वाधिक ३.३९ टक्क्यांनी वाढला. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक यांचा क्रमांक लागतो.

मंगळवारी अमेरिकेचे बाजार घसरले होते

भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, बजाज फिनस र्व्ह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज १.३२ टक्क्यांपर्यंत घसरले. आशियामध्ये सोल आणि टोकियोमधील बाजार उच्च पातळीवर बंद झाले. तर शांघाय आणि हाँगकाँग लाल चिन्हात स्थिरावले. मध्य सत्रातील सौद्यांमध्ये युरोपमधील बाजारपेठा मुख्यतः उच्च पातळीवर व्यवहार करीत होत्या. मंगळवारी अमेरिकेचे बाजार घसरले होते.

दोन दिवसांच्या घसरणीला मागे टाकले

निफ्टीने २७ जुलै रोजी सायंकाळी येणाऱ्या यूएस फेडच्या बैठकीच्या निकालापूर्वी दोन दिवसांच्या घसरणीला मागे टाकले, असे एचडीएफसीचे रिटेल रिसर्च प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.५३ टक्क्यांनी वाढून १०५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. एक्सचेंज डेटानुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी पुन्हा १,५४८.२९ कोटींचे शेअर्स ऑफलोड केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT