Sun Pharma esakal
अर्थविश्व

Sun Pharma : या लॉर्जकॅप फार्मा स्टॉकने 1 वर्षात दिला बंपर रिटर्न...

जून तिमाहीत हा स्टॉक 41 म्युच्युअल फंड योजनांमध्ये समाविष्ट करण्यात आला होता.

शिल्पा गुजर

फार्मा सेक्टरमधील लार्जकॅप स्टॉक सन फार्मा (Sun Pharma) म्युच्युअल फंडांचा आवडता स्टॉक आहे. म्युच्युअल फंडांनी आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत सन फार्मामधील त्यांचा हिस्सा 11.84 टक्क्यांवरून 12.22 टक्क्यांवर वाढवला आहे. सप्टेंबर तिमाहीत हा स्टॉक 43 म्युच्युअल फंड योजनांचा एक भाग होता. तर जून तिमाहीत हा स्टॉक 41 म्युच्युअल फंड योजनांमध्ये समाविष्ट करण्यात आला होता.

सन फार्माचा शेअर शुक्रवारी दुपारी 1:00 च्या सुमाराला एनएसीवर 3.35 म्हणजेच 0.35 टक्‍क्‍यांच्या घसरणीसह 1010 रुपयांच्या आसपास दिसला. या शेअरचा शुक्रवारचा नीचांक 1006.50 रुपये आहे. तर, दिवसाचा उच्चांक 1017.85 रुपये आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1070.95 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 1006.50 रुपये आहे.

3 वर्षांत137.98 टक्के रिटर्न

गेल्या एका महिन्यात हा शेअर 3.24 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांत सन फार्माचा शेअर 1.17 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, या वर्षी आतापर्यंत या शेअरमध्ये 19.43 टक्क्यांची वाढ झाली आहे. सन फार्मा गेल्या 12 महिन्यांत 27.74 वाढला, तर 3 वर्षात त्याने 137.98% परतावा दिला आहे.

एलआयसीकडून हिस्सेदारीत घट

जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत सन फार्मामध्ये एलआयसीची होल्डिंग 10,51,66,136 शेअर्स म्हणजेच 4.38 टक्के होती. त्याच वेळी, एप्रिल-जून 2022 तिमाहीत, कंपनीमध्ये एलआयसीची होल्डिंग 13,16,69,295 म्हणजेच 5.49 टक्के होती. याचा अर्थ एलआयसीने एप्रिल-जून 2022 तिमाहीच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत सन फार्ममधील आपला हिस्सा 1.11 टक्क्यांनी कमी केला आहे.

ब्रोकरेज हाऊसेस सम फार्माच्या शेअरबाबत सकारात्मक आहेत. शेअरखानने 1,300 रुपयांच्या टारगेटसह या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. त्याच वेळी प्रभुदास लिलाधर यांनी या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे आणि 1175 रुपयांचे टारगेट दिले आहे. सध्या हा शेअर 1010 रुपयांवर ट्रेड करत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine Ceasefire : रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या ठरावादरम्यान भारत अनुपस्थित, अमेरिकेनीही घेतला नाही सहभाग; झेलेन्स्कींना झटका !

Mumbai Railway : T20 वर्ल्ड कप बघायला आलेल्या विदेशी पर्यटकांच्या रील्समधून मुंबईतील रेल्वेंची 'थू-थू'; कचरा, अतिक्रमणाचे व्हिडिओ व्हायरल; हे स्टेशन की कचराकुंडी?

T20 World Cup: पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची देहबोली बदलली; सरावातही लक्षणीय बदल

Holi 2026: बरसाना विसरा! 'या' गावात महिला मारतात लाठ्या आणि पुरुष नाचतात साडी नेसून; लट्ठमार होळीचे हे ठिकाण माहीत आहे का?

Ration card verification : सर्वेक्षणातून होणार रेशन ग्राहकांची खातरजमा; घरोघरी जाऊन घेतली जाणार माहिती, केंद्र सरकारकडून खासगी कंपनी नियुक्ती

SCROLL FOR NEXT