tata tata
अर्थविश्व

Tata Digitalची मोठी घोषणा, फार्मा ऍप 1MG मध्ये करणार गुंतवणूक

कंपनीचा हा निर्णय BigBasket च्या खरेदीनंतर आणि Curefit मधील गुंतवणुकीच्या घोषणेच्या आठवड्यानंतर आला आहे

प्रमोद सरवळे

बंगळूरू: टाटा सन्सची (Tata Sons Private Limited) सहाय्यक कंपनी असणारी टाटा डिजीटल लिमीटेडने ( Tata Digital Ltd) गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये टाटा डिजीटल कंपनी आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या '1MG Technologies Private Ltd' कंपनीचे शेअर्स घेत आहे. कंपनीचा हा निर्णय BigBasket च्या खरेदीनंतर आणि Curefit मधील गुंतवणुकीच्या घोषणेच्या आठवड्यानंतर आला आहे.

tata digital

एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, आरोग्य क्षेत्राशी निगडीत 1MG मधील गुंतवणूकचा उद्देश टाटा समुहामार्फत ग्राहकांचा या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आहे. यामुळे ई- फार्मसी आणि ई- डायग्नोस्टिक सेक्टरमध्ये चांगल्या प्रतिचे हेल्थकेअर उत्पादने आणि सेवा देण्यास मदत होईल. तसेच कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीला फिटनेस स्टार्टअप क्युरफिटमध्ये (fitness startup CureFit) 75 दशलक्ष डॉलरची गुंतवणूकही केल्याची घोषणा अध्यक्ष मुकेश बंन्सल (Mukesh Bansal) यांनी केली होती.

कोरोनाकाळात ई-फार्मसी, ई-डायग्नोस्टिक्स आणि टेलि-कन्सल्टेशनला मागील काही दिवसांत मोठी मागणी वाढताना दिसत आहे. सर्वात वेगाने विकसित होणार्‍या क्षेत्रांपैकी एक आहे. कारण या कोरोनाने सर्व देशभराच्या आरोग्य सेवेमध्ये लोकांचा प्रवेश सुकर केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे 1MG चे को-फाउंडर आणि सीईओ प्रशांत टंडन म्हणाले की, आम्हाला भारतातील मोठ्या विश्वासू समुहासोबत एकत्र होण्याचा मोठा आनंद आहे. ही बाब संपुर्ण भारतीयांच्या फायद्याची आहे. त्यांची योग्य दरात चांगली हेल्थकेअर उत्पादने मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT