TATA groups esakal
अर्थविश्व

TATA Group : 'या' शेअर्सने एका वर्षात दिला छप्परफाड 1000 टक्के परतावा

अगदी छोट्या ट्रिगरवरही हा शेअर खूप अस्थिर असू शकतो.

शिल्पा गुजर

अगदी छोट्या ट्रिगरवरही हा शेअर खूप अस्थिर असू शकतो.

रुस-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine war) जागतिक बाजारपेठेत बरीच अस्थिरता आहे. याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही (Share Market) होत आहे. असे असूनही, टाटा ग्रुपचा स्टॉक ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज अँड असेंबलीज लिमिटेडमध्ये (Automotive Stampings and Assemblies Ltd) लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात, हा स्टॉक 285 रुपयांवरुन (22 फेब्रुवारी 2022) 415.45 रुपयांवर (22 मार्च 2022) वाढला. दरम्यान, या शेअरने 244.40 रुपये (25 फेब्रुवारी 2022) ची नीचांकी पातळी गाठली होती. पण नंतर मात्र तेजी दाखवत हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला. गेल्या वर्षभरात या शेअरने 1000 टक्के परतावा दिलेला आहे. पण, हा एक अस्थिर स्टॉक आहे. 22 मार्च रोजी सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात या शेअरमध्ये लोअर सर्किट लागले होते.

1 वर्षात 1 लाखाचे 11 लाख

गेल्या एका वर्षात ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज अँड असेंबलीज लिमिटेडमध्ये (Automotive Stampings and Assemblies Ltd) हा शेअर जवळपास 1,000 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच वर्षभरापूर्वी एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 11 लाख रुपये झाले असते. वर्षभरात या शेअरचा प्रवास 35.75 रुपये (23 मार्च 2020) आणि 415.45 (22 मार्च 2022) असा झाला. स्टॉकचा सर्वकालीन उच्चांक (All Time High) 925.45 रुपये आणि सर्वकालीन निचांक (All Time Low) 30.25 रुपये होता.

गेल्या 6 महिन्यांचा रिटर्न चार्ट पाहिला तर, या शेअरने गुंतवणूकदारांना 500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या शेअरची सध्याची ट्रेड वॉल्‍यूम 17,220 आहे. त्यामुळे हा लो लिक्विड हाय रिस्‍क स्‍टॉक आहे. त्यामुळे अगदी छोट्या ट्रिगरवरही हा शेअर खूप अस्थिर असू शकतो.

TATA ऑटोकॉम्प सिस्टम्सची उपकंपनी

ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबलीज लिमिटेड (ASAL), टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडची उपकंपनी आणि टाटा एंटरप्राइझचा भाग आहे. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबलीज लि. शीट मेटल घटक, वेल्डेड असेंब्ली आणि प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टरसाठी मॉड्यूल्स बनवते आणि पुरवते. कंपनीच्या प्रॉडक्‍ट रेंजमध्ये बॉडी इन व्हाइट (BIW) स्ट्रक्चरल पँटस, स्किन पॅनेल्स, फ्यूएल टँक्‍स, रीअर ट्विस्ट बीम, ऑइल सम्‍प्‍स आणि सस्पेंशन यांचा समावेश आहे. ASAL चे सध्या पुण्यात आणि उत्तराखंडमधील पंतनगरमध्ये दोन प्लांट्स आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT