tata group
tata group sakal
अर्थविश्व

Tata Group: टाटाच्या 'या' मल्टीबॅगर शेअरला तज्ज्ञांकडून बाय रेटींग...

सकाळ डिजिटल टीम

टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी परताव्याच्या बाबतीत मल्टीबॅगर सिद्ध झाली असून आता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) क्षेत्रातील टाटा कंझ्युमरने (Tata Consumer) 27 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे 29 पटीने वाढवले आहेत. त्यात देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या शेअरवर आपले बाय रेटिंग कायम ठेवले आहे.

टाटा कंझ्युमर ही जगातील दुसरी सर्वात मोठी चहा कंपनी आहे आणि कॉफीच्या बाबतीतही प्रसिद्ध आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी यामध्ये गुंतवणुकीसाठी 890 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा 12 टक्के जास्त आहे. नुकताच हा शेअर बीएसईवर 796.75 रुपयांवर बंद झाला. (tata group this tata stock was given rating by expert in share market)

27 वर्षांत किंमतीत 29 पट वाढ

14 जुलै 1995 रोजी टाटा कंझ्युमरच्या शेअर्सची किंमत 29.40 रुपये होती, जी आता 796.75 रुपयांपर्यंत पोहोचली आहे म्हणजेच गुंतवणूकदारांच्या पैशात 29.40 पट वाढ झाली आहे. आता जर आपण या वर्ष 2022 बद्दल बोललो तर हा शेअर 6.55 टक्क्यांनी वाढला आहे आणि पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 287 टक्के परतावा दिला आहे.

गेल्या वर्षी 18 ऑक्टोबर 2021 रोजी टाटा कंझ्युमरचे शेअर्स 862.50 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावर होते. त्यानंतर त्यात घसरण सुरू झाली आणि या वर्षी 7 मार्च रोजी तो 650.75 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. पण, त्यानंतर खरेदी वाढली आणि आतापर्यंत सुमारे 22 टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर 796.75 रुपयांवर पोहोचला.

चहाच्या घसरलेल्या किमतींमुळे कंपनीचे स्टँडअलोन ग्रॉस मार्जिन गेल्या पाच तिमाहीत वाढत आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत त्याची सरासरी किंमत 11 टक्क्यांनी घसरून 147.6 रुपये प्रति किलो झाली आहे. मात्र, त्यानंतर जुलैपासून त्याचे भाव वाढू लागलेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT