pf
pf esakal
अर्थविश्व

मोदी सरकारने 6.47 कोटी खात्यांमध्ये PF व्याजाचे पैसे केले जमा

शिल्पा गुजर

ईपीएफओने सर्व पगारदार कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफचे व्याज हस्तांतरित केले आहे.

PF Balance: मोदी सरकारच्या वतीने, EPFO ने EPF सदस्यांच्या पीएफ खात्यात पैसे हस्तांतरित (Transfer) केले आहेत. ईपीएफओने सर्व पगारदार कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफचे व्याज हस्तांतरित केले आहे. EPFO ने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली. आर्थिक वर्ष 2020-21 साठी PF खात्यावर 8.50 टक्के व्याज आले आहे. आतापर्यंत 6.47 कोटी खात्यांमध्ये व्याज खात्यात जमा करण्यात आली आहे.

मोदी सरकारच्या वतीने, EPFO भविष्य निर्वाह निधी (PF) ग्राहकांच्या खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित केले आहेत. तुम्ही खालील मार्गांनी तुमची शिल्लक तपासू शकता.

1) एसएमएसद्वारे तपासा

ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) पाठवा. LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. मराठीत माहिती हवी असल्यास MAR लिहावे. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल.

2) मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या

तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमची ईपीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

ऑनलाइन कसे जाणून घेऊ शकता...

3) वेबसाइटद्वारे

तुमची शिल्लक ऑनलाइन तपासण्यासाठी, EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये, Download/View Passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्ही बॅलन्स पाहू शकता.

4) उमंग ॲपद्वारे

तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही हवे तेव्हा ॲपद्वारे तुमचा ईपीएफ बॅलेन्स तपासू शकता. यासाठी UMANG ॲप ओपन करा आणि EPFO वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो टाकल्यानंतर, तुम्ही EPF बॅलेन्स पाहू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT