US Federal Reserve New Interest Rate
US Federal Reserve New Interest Rate सकाळ
अर्थविश्व

फेडरल रिजर्व्हकडून मोठी व्याजदरवाढ, Share Market मध्ये चिंतेचे वातावरण

सकाळ डिजिटल टीम

यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्के वाढ जाहीर केली आहे. 28 वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिकेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कठोर पाऊल यूएस फेडरल बँकने उचलले आहे. अमेरीकेत महागाई दर हा 40 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. मे महिन्यात हा महागाई दर 8.6 टक्के नोंदवला गेला. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या या सेंट्रल बँकेने यावर तोडगा म्हणून व्याजदरात वाढ केली आहे.

0.75 टक्क्यांनी झालेली ही व्याजवाढ ही 1994 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. सध्या यूएस फेडच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे भारतीय चलनावर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे.

व्याजदर वाढल्याने डॉलर मजबूत होईल, परंतु रुपयाचे आणखी मूल्य आणखी घसरू शकते डॉलरच्या तुलनेत रुपया आधीच निचांकी पातळीवर आहे. परकीय चलन बाजारात बुधवारी रुपया 18 पैशांनी घसरून अमेरिकन चलनाच्या तुलनेत 78.22 या निचांकी पातळीवर पोहोचला होता. देशांतर्गत शेअर बाजारात सध्या निराशाजनक वातावरण आहे.

घोषणेपूर्वीच शेअर बाजारात घसरण

यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह बैठकीच्या निकालापूर्वी व्यापाऱ्यांनी स्वतःला शेअर बाजारापासून दूर केले होते. व्यापार जगतात एक म्हण आहे की अमेरिकेला शिंक आली तरी जगाला सर्दी होते. यूएस फेडच्या बैठकीपूर्वी, व्याजदरात वाढ होण्याच्या अंदाजामुळे जगभरातील शेअर बाजारात घसरण झाली होती. जेव्हा यूएसमध्ये व्याजदर कमी राहतो, तेव्हा शेअर बाजार मोठ्या दणक्यात चालतो.

भारतावर काय परिणाम होईल?

जेव्हा यूएसमध्ये व्याजदर वाढतो, तेव्हा जगभरातील देश त्यांचे मुख्य व्याजदर देखील वाढवू लागतात. भारतातही अमेरिकेकडून व्याजदरात वाढ होण्याची दाट अपेक्षा असताना आरबीआयने रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.

यूएस बँक व्याजदर का वाढवत आहे?

अमेरिकेतील महागाई दर 40 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. मे महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर ८.६ टक्के नोंदवला गेला होता. फेड रिझर्व्हने केवळ महागाई रोखण्यासाठी मुख्य व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT