Sindhu Trade Links Ltd stock Sakal
अर्थविश्व

या स्मॉलकॅप स्टॉकचा 1 वर्षात 1846% परतावा, रेकॉर्ड डेटपूर्वी अपर सर्किटला धडक

सिंधू ट्रेड लिंक्सचा स्टॉक मागील वर्षी 5.78 रुपयांवरून 113 रुपयांपर्यंत वाढला आहे.

शिल्पा गुजर

सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेड (Sindhu Trade Links Ltd) ही 5,820 कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटल असलेली स्मॉल-कॅप कंपनी आहे. ही कंपनी फायनान्स सेक्टरमधील व्यवसायात तगडीआहे. आज 110 रुपयांवर हा शेअर उघडला. त्यानंतर त्यात वाढ झाली. तर BSE वर लिस्ट स्टॉक आज सकाळी 9.50 वाजता 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर 113.25 रुपयांवर पोहोचला.

सिंधू ट्रेड लिंक्सचा स्टॉक मागील वर्षी 5.78 रुपयांवरून 113 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याने आपल्या गुंतवणूकदारांना या काळात 1,846.37 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 11 मे 2022 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत, कंपनीच्या बोर्डाने 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स घोषित केले.

बोर्डाने बोनस शेअर्ससाठी 20 मे 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. याचा अर्थ उद्या, 19 मे 2022 रोजी स्टॉक एक्स-बोनस होईल. संचालक मंडळाने बोनस शेअर बोनस शेअर जारी करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. शुक्रवार, 20 मे 2022 रोजी, शेअर्स 2:1 च्या प्रमाणात दिले जातील म्हणजेच 1 रुपयाच्या प्रत्येक 1 शेअरसाठी 2 नवीन इक्विटी बोनस शेअर्स दिले जातील.

मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या शेअरवर गेल्या एक महिन्यापासून 12.79 टक्क्यांच्या घसरणीसह विक्रीचा दबाव आहे. तरीही, बेंचमार्क बीएसई सेन्सेक्समध्ये 9.03 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 90.65 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, या वर्षी आतापर्यंत, स्टॉक 72.84 रुपयांवरून 112.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. यामध्ये 2022 मध्ये 54.45% ची वाढ दिसून आली आहे.

स्टॉकने 22 फेब्रुवारी 2022 रोजी 52-आठवड्याच्या उच्चांकी 166.20 रुपये आणि BSE वर 20 मे 2021 रोजी 52-आठवड्यांच्या नीचांकी 5.78 रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ स्टॉक त्याच्या 52-आठवड्यांच्या उच्चांकावरून 31% खाली व्यापार करत आहे. सध्याच्या बाजारभावानुसार, स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग अॅव्हरेजच्या वर पण 50 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली ट्रेडिंग करत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Supriya Sule Video: आमच्या सिरियलवर तोडगा काढा, पैसे वाया जातात; पुणेरी आजीबाईंचा प्रश्न- सुप्रिया सुळेंना उत्तर सुचेना

DMart Stock Price: डीमार्टच्या प्रॉफिटमध्ये 15 टक्के वाढ; तरीही शेअर 3 टक्के घसरला, गुंतवणूक करावी का?

'फुलपाखरू' मालिका अर्ध्यातच का सोडलीस? चेतन वडनेरेने सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'एक वेळ अशी आली जेव्हा...'

SCROLL FOR NEXT