Share Market esakal
अर्थविश्व

Share Market: या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, तीन वर्षांत भरभक्कम परतावा...

देव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Share Market: शेअर बाजारात योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर बंपर रिटर्न मिळू शकतो. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना तगडा परतावा दिला आहे.

देव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्यांची मार्केट कॅप 239.15 कोटी आहे. देव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेडची स्थापना 1997 मध्ये झाली. कंपनी देशातील चांगल्या आयटी सेवा देणार्‍यांपैकी एक आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 11 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिटची तारीख निश्चित केली आहे.

देव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेडचे शेअर्स शुक्रवारी 215.00 रुपयांवर होते. 17 एप्रिल 2017 रोजी शेअर बाजारावर 42 रुपयांवर लिस्ट झालेत, तेव्हापासून त्यांनी गेल्या 5 वर्षांत 600% परतावा दिला आहे. तर मागील 3 वर्षात या शेअरने 473% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे आणि मागील 1 वर्षात शेअरने 194.72% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

आणखी तेजीचे संकेत

यावर्षी आतापर्यंत हा स्टॉक 61.47% वाढला आहे. एनएसईवर या शेअरने 254.60 या 52आठवड्यांचा उच्चांक आणि 102.50 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला होता. शुक्रवारी, स्टॉक 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस आणि 50-दिवसांच्या SMA च्या खाली पण 100-दिवस आणि 200-दिवसांच्या साध्या मूव्हिंग सरासरीच्या वर (SMA) ट्रे़ड करताना दिसला.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT