TATA GROUP SHARES esakal
अर्थविश्व

TATA ग्रुपच्या 'या' शेअरने 3 महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट...

गेल्या 3 महिन्यांचा या शेअरचा चार्ट बघितला तर तो दुपटीहून अधिक वाढला आहे

सकाळ डिजिटल टीम

Tata Group: या ग्रुपच्या अनेक शेअर्सने कायमच गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या 3 महिन्यांत, टाटा ग्रुपचा टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (Tata Investment Corporation) मल्टीबॅगर म्हणून समोर आला आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यातील ट्रेडिंग सत्रात 47 टक्क्यांहून जास्त वाढ दिसली. 15 सप्टेंबर 2022 ला स्टॉकने बीएसईवर 52 आठवड्यांचा हाय 2886.50 रुपये बनवला. गेल्या 3 महिन्यांचा या शेअरचा चार्ट बघितला तर तो दुपटीहून अधिक वाढला आहे.

3 महिन्यात दुप्पट पैसे

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (TICL) च्या शेअर्सने गेल्या तीन महिन्यांत 125 टक्के मजबूत परतावा दिला आहे. या दरम्यान, शेअरची किंमत 1231.35 (20 जून 2022) रुपयांवरून 2763.90 (16 सप्टेंबर 2022) रुपयांपर्यंत वाढली. अवघ्या 1 महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये आतापर्यंत सुमारे 81 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील 6 महिन्यांचा परतावा 99 टक्क्यांहून अधिक आहे.

TICL चा व्यवसाय काय ?

टाटा सन्सची कंपनी टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (TICL) ही एक नॉन-बँकिंग फयनांशियल कंपनी (NBFC) आहे जी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इन्वेस्टमेंट कॅटेगरी अंतर्गत नोंदणीकृत आहे. कंपनी इक्विटी शेअर्स, डेट इन्स्ट्रुमेंट्स, लिस्टेड, अनलिस्टेड आणि कंपन्यांच्या इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करते.

कंपनीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत डिव्हिडेंड, व्याज आणि गुंतवणुकीच्या विक्रीतून मिळणारा नफा आहे. टाटा इन्व्हेस्टमेंटने उत्तम पोर्टफोलिओ व्यवस्थापनाद्वारे गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार केला आहे. जून तिमाहीत (Q1FY23), कंसॉलिडेटेड नेट प्रॉफिट

66.5% ने वाढून 89.7 कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 60 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime : झोक्यावर खेळताना गळफास लागून ९ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; कृष्णा बेशुद्ध झाला अन्...

आमदार काकांनी केला ठेकेदार पुतण्याचा पर्दाफाश, बनावट कागदपत्रे जोडून जिल्हा परिषदेची फसवणूक; गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : सोलापुरात शरद पवार यांचे आमदार अजित पवार गटाच्या मंचावर उपस्थित

Weekly Love Horoscope 27 October to 2 November 2025: बुध-मंगळ युतीमुळे मेष, कन्यासह 'या' राशींची लव्ह लाइफ असेल आनंदी

Train Ticket Booking Tips: ट्रेन तिकीट बुक करताय? मग आधी 'हे' एक काम करा,मिळेल कन्फर्म तिकिट

SCROLL FOR NEXT