share market. Sakal
अर्थविश्व

Share Market : टेक्सटाइल सेक्टरमधला 'हा' शेअर देईल दमदार परतावा, तज्ज्ञांना विश्वास...

गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून बरीच अस्थिरता दिसून येते आहे. कधी सलग आठ ते नऊ दिवस तेजी तर कधी बाजारात घसरण सुरु आहे,अशा वेळी चांगल्या दमदार शेअर्समध्ये पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळेच बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी एका स्टॉकची निवड केली आहे आणि यात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे.

संदीप जैन यांनी राजस्थान स्पिनिंग अँड वेव्हिंग मिल्स (RSWM) निवड केली आहे. ही कंपनी राजस्थानच्या भिलवाडा इथे आहे आणि कापड क्षेत्रात काम करते. ही कंपनी 62 वर्षे जुनी आहे आणि 76 देशांमध्ये तिचा व्यवसाय आहे. याशिवाय कंपनीचे 10 प्लांट्स आहेत. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • राजस्थान स्पिनिंग अँड वेव्हिंग मिल्स (RSWM)

  • सीएमपी (CMP) - 434 रुपये

  • टारगेट (Target) - 470 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स ?

हा स्टॉक 3.5 च्या PE मल्टिपलवर व्यवहार करतो आणि 6 टक्के डिव्हिडेंड देतो. तर स्टॉकच्या इक्विटीवर परतावा 26 टक्के आहे. गेल्या 3 वर्षात कंपनीच्या नफ्याचा CAGR दुपटीने वाढला आहे.

राजस्थान स्पिनिंग अँड वेव्हिंग मिल्स (RSWM) कंपनीवर 1500 कोटी रुपयांचे कर्ज आहे, पण कंपनी ते हळूहळू कमी करत आहे. शिवाय वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनीवर कर्ज असणे अत्यावश्यक आहे. जून 2021 मध्ये 37 कोटी रुपयांचा नफा झाला होता आणि जून 2022 मध्ये 71 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. या शेअरमध्ये प्रमोटर्सची 74 टक्के हिस्सेदारी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT