Stocks to Buy Esakal
अर्थविश्व

एनर्जी सेक्टरचा 'हा' शेअर देईल भरघोस नफा, तज्ज्ञांना विश्वास

शेअर चांगला नफा कमावू शकतो

शिल्पा गुजर

Stock to buy: शेअर मार्केटमध्ये चांगली कमाई करण्यासाठी, मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स निवडावे जे तुम्हाला चांगला परतावा देतील. हीच बाब लक्षात घेऊन शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे. एशियन एनर्जी सर्व्हिसेसचे (Asian Energy Services ) शेअर खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. हा शेअर चांगला नफा कमावू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(this share of the energy sector will give huge profits experts advise)

एशियन एनर्जी सर्व्हिसेस (Asian Energy Services)
एशियन एनर्जी सर्व्हिसेस ही एक उत्तम दर्जाची कंपनी असल्याचे संदीप जैन सांगतात. मार्केट करेक्शननंतर, याचे शेअर्स चांगले परफॉर्म करत आहेत. येत्या काळात हे स्टॉक्स पुन्हा उच्चांकी पातळी गाठतील असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला.

एशियन एनर्जी सर्व्हिसेस (Asian Energy Services)
सीएमपी (CMP) - 166.50 रुपये
टारगेट (Target) - 190 रुपये

कंपनीचे निकाल?
एशियन एनर्जी सर्व्हिसेस ही कंपनी 1992 मध्ये सुरू झाली. ही कंपनी ऑईल सेगमेंटला सेवा देते आणि इतर टेकनिकल कामे देखील करते. जून तिमाहीत त्यांचा निकाल खूप चांगला लागला होता. कंपनीला 21 कोटी रुपयांचा नफा झाला. सध्या त्याचा स्टॉक 12 च्या PE मल्टीपलवर ट्रेडिंग करत आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (ROCE) 20 टक्के आहे तर रिटर्न ऑन इक्विटी (RoE) 18 टक्के आहे.

गेल्या 5 वर्षातील कंपनीच्या नफ्याचा CAGR (कंपाऊंड Compound annual growth rate) बघितला तर तो 27 टक्के झाला आहे. त्याच वेळी, सेल्सचा सीएजीआर 24 टक्के आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. एशियन एनर्जी सर्व्हिसेसचे तिमाही निकालही खूप चांगले आले आहेत. 190 ची पातळी गाठल्यानंतर आता त्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT