Tiktok Sakal
अर्थविश्व

बंदी असूनही टिकटॉकची चांदी

योगेश कानगुडे

मोबाईलवर छोटे-छोटे व्हीडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या टिकटॉकची (Tiktok) मालकी असलेल्या 'बाईट डान्स'(ByteDance) या चीनमधील कंपनीच्या कमाईत भरघोस वाढ झाली आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्रक काढून सांगितले आहे की 2020 मध्ये कंपनीची एकूण कमाई 111% ने वाढून 34.3 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गुरुवारी कंपनीने आपल्या 2020 च्या आर्थिक वर्षातील कामिगरीबाबतच्या काही महत्त्वाच्या बाबी आपल्या कर्मचार्‍यांना सांगितली. (TikTok owner ByteDance’s annual revenue jumps to $34.3 Billion)

बाईट डान्सने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, डिसेंबर 2020 पर्यंत सर्व प्लॅटफॉर्मवर महिन्याला 1.9 अब्ज सक्रिय वापरकर्ते होते. कंपनी ड्युयिन, टिकटॉकसारखे असणारे घरगुती चिनी अ‍ॅप्स बरोबर जिनरी टोथियाओ नावाचे एक न्यूज अ‍ॅग्रीगेशन अ‍ॅप्स देखील चलवते.

बीजिंगस्थित असलेल्या या कंपनीने कर्मचार्‍यांना सांगितले की गेल्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 2.1 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. या प्रकरणाची माहिती असलेल्या तज्ज्ञांच्या मते, हिस्सा-आधारित नुकसान भरपाईपेक्षा जास्त खर्च झाल्यामुळे हा तोटा झाला. याचवर्षी बाईट डान्सने 684 दशलक्ष डॉलर्सचा नफा नोंदविला होता.

एका लेखा समायोजनमुळे 2020 मध्ये कंपनीला 45 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. इंटरनॅशनल फिनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्डनुसार जर स्टार्टअप्सने देशाबाहेरील निधी गोळा केला असेल तर त्यांना त्यांच्या व्यवसायाचे मूल्य वाढताच नॉन-कॅश शुल्क घ्यावे लागते.

चीनी उद्योजक झांग यिमिंग यांनी 2012 मध्ये सुरू केलेल्या बाईट डान्सने केकेआर अँड कंपनी, सेक्वाइया कॅपिटल आणि जनरल अटलांटिक या जागतिक गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी डॉलर्स जमा केले आहेत. फिडेलिटी इन्व्हेस्टमेन्ट्स आणि त्यातील काही विद्यमान भागधारकांचा समावेश असलेल्या निधी उभारणीच्या फेरीनंतर 2020 च्या उत्तरार्धात या कंपनीचे मूल्य 1 अब्ज डॉलर्स होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT