Today's Gold Silver Price Sakal
अर्थविश्व

Gold Silver Price: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या नवा दर

गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या भावात दरात अस्थिरता दिसून येत आहे

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या भावात दरात अस्थिरता दिसून येत आहे. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली होती. मात्र आज पुन्हा या घसरणीला ब्रेक लागला असून सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोबतच चांदीच्या दरात वाढ कायम आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,200 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर आज 624 रूपयावर कायम आहे. (Today's Gold, Silver Price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 52,250 रुपये

दिल्ली - 52,200 रुपये

हैदराबाद - 52,200 रुपये

कोलकत्ता - 52,200 रुपये

लखनऊ - 52,350 रुपये

मुंबई - 52,200 रुपये

नागपूर - 52,230 रुपये

पूणे -52,230 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narhari Zirwal video case : मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणाला नवे वळण, कथीत व्हिडिओतील तृतीयपंथीयाची स्वतःच्या भावाविरोधात पोलिसांत तक्रार

New Labour Code लागू! १ एप्रिलपासून पगार, ओव्हरटाईम आणि कामाचे नियम बदलणार; तुमच्या सॅलरीवर नेमका काय परिणाम?

Latest Marathi News Live Update : मेळघाट परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

IPL 2026: वैभव सूर्यवंशीने भरमैदानात कुणाला दिला Flying KISS? राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतरचा VIDEO VIRAL..

MLA Vijay Shivtare : बापासाठी काळजाचा तुकडा सरसावला! आमदार शिवतारेंना लेकीने दान केली किडनी; बाप-लेकीच्या नात्याला महाराष्ट्र करतोय 'सलाम'

SCROLL FOR NEXT