share market
share market sakal
अर्थविश्व

अंबानीपासून मस्कपर्यंत टॉप-10 उद्योगपतींना अब्जावधींचा फटका

सकाळ डिजिटल टीम

जगभरातील शेअर बाजारात घसरण सुरू आहे आणि याचा मोठा परिणाम जगातील टॉप-10 अब्जाधीशांवरही झाला आहे. सोमवारी, अदानी ते अंबानी आणि इलॉन मस्क ते सर्जी ब्रिन यांच्या संपत्तीत एकूण 42.6 अब्ज डॉलरचे नुकसान झाले.

सोमवारी शेअर बाजारात अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीत 3.7 अब्ज डॉलरची घसरण झाली तर यूएस शेअर बाजारातील घसरणीमुळे मस्क, बेझोस, बिलगेट्स, वॉरन बफे यांसारख्या अब्जाधीशांचेही नुकसान झाले आहेत.

सोमवारी सेन्सेक्स 1456 अंकांनी घसरून 52,846 च्या पातळीवर आणि निफ्टी 427 अंकांच्या घसरणीसह 15,774 च्या पातळीवर खाली आला तर अमेरिकन शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून आली.

टेस्ला इंकचे शेअर्समध्ये घसरण

एलोन मस्कची कंपनी टेस्ला इंकचे शेअर्स सोमवारी 7.10 टक्क्यांनी घसरले. याचाच परिणाम म्हणजे इलॉन मस्कची संपत्ती एका दिवसात 11.8 अब्ज डॉलरने कमी झाली आणि आता त्यांची एकूण संपत्ती 203.3 अब्ज डॉलरवर आली आहे.

ही आकडेवारी फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांची आहे. या यादीत बर्नार्ल्ड ऑर्नाल्ट आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, त्याला काल 5.8 अब्ज डॉलर धक्का बसलाय. आता त्याची एकूण संपत्ती फक्त 140.2 अब्ज डॉलर इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर अॅमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस आहेत, ज्यांना सोमवारी 6 अब्ज डॉलरचा धक्का बसला होता. एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत असलेले जेफ बेझोस यांची संपत्ती आता 129.4 अब्ज डॉलर आहे.

जगातील पहिल्या दहा अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या बिलगेट्सला 2.3 अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. त्यांची एकूण संपत्ती सध्या 121.2 अब्ज डॉलर आहे. वॉरन बफे यांना 3.8 अब्ज डॉलरचा झटका बसलाय

या शिवाय मुकेश अंबानींना 1.9 अब्ज डॉलरचा फटका बसला असून आता मुकेश अंबानी यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरवर आली आहे. अदानी देखील सोमवारी शेअर मार्केटच्या फटक्यातून वाचू शकले नाही आणि त्यांची एकूण संपत्ती 1.8 अब्ज डॉलरने कमी झाली. आता ते ९६.७ अब्ज डॉलरसह सातव्या स्थानावर आहे.

लॅरी पेजने 3.8 अब्ज डॉलर गमावले असून ते आठव्या स्थानावर आहे तर लॅरी एलिसन 4.39 अब्ज डॉलर गमावले असून नवव्या क्रमांकावर आहे तर 10व्या क्रमांकावर सर्जी ब्रिन असून त्यांना 3.5 अब्ज डॉलरचा धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT