वारसा हक्काने मिळालेली प्रॉपर्टी विकल्यावर टॅक्स भरावा लागेल का?

वारसा हक्काने मिळालेली प्रॉपर्टी विकल्यावर टॅक्स भरावा लागतो का? जाणून घ्या
TAX
TAXSakal

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना त्याची मालमत्ता मिळते. वारसाला ही मालमत्ता मृत्युपत्राद्वारे किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वैयक्तिक कायद्यानुसार मिळते. वैयक्तिक कायदा वापरला जातो जेव्हा व्यक्तीने मृत्यूपूर्वी मृत्युपत्र केले नसते.

जर तुम्हाला कोणतीही मालमत्ता (Property) वारसाहक्काने मिळाली असेल तर तुम्हाला त्यावर कोणताही कर (tax) भरावा लागणार नाही. याचे कारण भारतात वारसा कर (Inheritance Tax) नाही. पण, कलम 56(2)(X) गिफ्टवर कर बसू शकतो. पण तुम्हाला वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेतून काही उत्पन्न असेल, तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. दुसरे म्हणजे, जर तुम्ही वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता विकली तर तुम्हाला भांडवली नफा कर (Capital Gains Tax) भरावा लागेल.

TAX
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

वारसाने मिळालेल्या मालमत्तेवर भांडवली नफ्याच्या गणनेसाठी (Capital Gains Calculation) वेगळा नियम आहे. या अंतर्गत, जुन्या मालकाने ती प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी दिलेली किंमत तुमची संपादनाची (acquisition) किंमत मानली जाईल.

1 एप्रिल 2001 पूर्वी मालमत्ता खरेदी केली असल्यास, विकणाऱ्याकडे 1 एप्रिल 2001 रोजी त्या प्रॉपर्टीच्या फेअर मार्केट व्हॅल्यूचा कॅपिटल गेन्ससाठी कॉस्ट ऑफ एक्विजिशन मानण्याचा पर्याय असेल.

TAX
गुंतवणूकदारांना सात लाख कोटींचा दणका

योग्य बाजार मूल्य अर्थात फेअर मार्केट व्हॅल्यू जाणून घेण्यासाठी तुम्ही नोंदणीकृत मूल्यधारकाकडून (Registered Valuer) मूल्यांकन प्रमाणपत्र (valuation certificate) घेऊ शकता. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत, मालमत्तेचे वाजवी बाजार मूल्य 1 एप्रिल 2001 रोजीच्या मुद्रांक शुल्क मूल्यापेक्षा (Stamp Duty Valueation) जास्त असू शकत नाही.

आता प्रश्न असा आहे की, तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफा (Long Term Capital Gains) किंवा अल्प मुदतीचा भांडवली नफा (Short Term Capital Gains) भरावा लागेल हे कसे ठरवले जाईल? मालमत्तेच्या मूळ मालकाने ती प्रॉपर्टी केव्हा विकत घेतली यावरून हे निश्चित केले जाईल.

TAX
गुंतवणूकदारांना बुडवण्यात LIC चा IPO आशियात ठरला नंबर वन

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com