अर्थविश्व

तिप्पट परतावा हवाय? 'या' 6 स्मॉलकॅप फंड्सने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत

शरयू काकडे

निफ्टी स्मॉलकॅप 100 - TRI मध्ये गेल्या दीड वर्षात 221 टक्क्यांची भक्कम वाढ बघायला मिळाली आहे. त्याने जवळपास सर्व बेंचमार्क निर्देशांकांना (Index) मागे टाकले आहे. स्मॉल कॅप फंडस्मध्ये एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना या काळात भरघोस परतावा मिळाला आहे.

स्मॉलकॅप फंड अस्थिरतेबाबत (Volatility) अत्यंत संवेदनशील आहेत, म्हणजेच बाजारात मंदी आल्यास एसआयपीमध्ये जास्त युनिट्स मिळतात, तर बाजारात वाढ झाल्यास कमी युनिट्स मिळतात. ज्यामुळे शेवटी खूप चांगला परतावा (Return) मिळतो.

आता आम्ही 6 स्मॉल कॅप फंडस् यादी देत ​​आहोत ज्यात SIP केलेल्या गुंतवणूकदारांची संपत्ती गेल्या 10 वर्षात तिप्पट झाली आहे. पण एखाद्या फंडाची आधीची कामगिरी यावर त्याच्या भविष्यातील कामगिरीची हमी देता येत ​​नाही, हे ध्यानात असू द्या.

या यादीत निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाचे नाव सर्वात वर आहे. या फंडात दरमहा 10000 रुपयांची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराचे 10 वर्षात 47 लाख रुपये झाले. या 10 वर्षांच्या एसआयपीचा परतावा सुमारे 26 टक्के आहे. त्याचप्रमाणे, एसबीआय स्मॉल कॅप फंडाने 10 वर्षांच्या एसआयपीवर 26 टक्के परतावा (XIRR यानी Extended Internal Rate of Return) दिला आहे

तुम्ही इतर फंड्सवर नजर टाकली तर कोटक स्मॉल कॅप फंडाने ( Kotak Small Cap Fund ) 10 वर्षांच्या काळात एसआयपीमध्ये 23 टक्के परतावा (Return) दिला आहे. दुसरीकडे, विनीत सांब्रे यांच्या डीएसपी स्मॉल कॅप (DSP Small cap )फंडाने 10 वर्षांच्या एसआयपीमध्ये 22 टक्के परतावा (Return) दिला आहे.

फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कॉस फंडाने (Franklin India Smaller Cos Fund ) 10 वर्षांच्या एसआयपीवर 20 टक्के परतावा (Return) दिला आहे. जर 10 वर्षात या फंडात 12 लाख रुपये गुंतवले गेले असतील तर या 12 लाख रुपये 35 लाख रुपये झाले आहेत. म्हणजेच गुंतवलेली रक्कम या कालावधीत जवळपास तिप्पट झाली आहे.

दूसरीकडे एचडीएफसी स्मॉल कॅप फंडाने (HDFC Small Cap Fund) 10 वर्षांच्या SIP वर 20 टक्के परतावा XIRR (return) दिला आहे. जर या फंडात 10 वर्षात 12 लाख रुपये गुंतवले गेले असतील तर या 12 लाख रुपयांचे 35 लाख रुपये झाले आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT