अर्थविश्व

'आयएल अँड एफएस'ला सावरण्यासाठी उदय कोटक यांना मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर्जसंकटात सापडलेल्या 'आयएल अँड एफएस'ला सावरण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेचे संचालक उदय कोटक यांना आणखी एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे. गेल्यावर्षी देशातील सर्वात मोठ्या एनबीएफसीला वाचविण्यासाठी सरकारने एक समिती गठीत केली होती. उदय कोटक हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीत सेबीचे माजी अध्यक्ष जी एन वाजपेयी, आयसीआयसीय बॅंकेचे चेअरमन जी सी चतुर्वेदी, टेक महिंद्राचे विनीत नय्यर आणि माजी सनदी अधिकारी मालीनी शंकर तसेच नंद किशोर यांचा समावेश आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात तीन महिन्यांसाठी उदय कोटक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यात नऊ महिन्यांची वाढ करण्यात आली होती. ही मुदत बुधवारी संपणार आहे. त्यामुळे त्याअगोदरच त्यात पुन्हा एक वर्षांची वाढ करण्यात आली आहे.

बँकिंग रेग्युलेशन ऍक्टनुसार बँकेचे व्यवस्थापन इतर कोणत्याही कंपनीचे संचालक असणारी कोणतीही व्यक्ती करू शकत नाही. आरबीआयच्या सहमतीने एखाद्या व्यक्तीला तीन महिने किंवा नऊ महिने तात्पुरता अपवाद म्हणून हा कार्यभार दिला जातो. मात्र आता त्यात एक वर्षांची करण्यात आलेली वाढ ऐतिहासिक मानली जात आहे. आरबीआयच्या पूर्वपरवानगीने अर्थखात्याच्या सेवा विभागाने हे पत्रक जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT