Union Budget 2023 experts opinion on Budget 2023 presented by nirmala sitharaman  esakal
अर्थविश्व

Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पावर तज्ज्ञांच मत काय? जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

Experts Opinion on Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान संसदेत यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता तज्ञांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत.

अर्थसंकल्पावर तज्ज्ञ काय म्हणतात?

मूलभूत सुविधांवर या अर्थसंकल्पात खूप भार दिला गेला आहे. जीडीपी यामुळे वाढू शकतो. बजेट बऱ्यापैकी चांगल्या बेसेस वर वाचले गेले आहे. बऱ्याच योजना राबवल्या गेल्या आहेत अशी प्रतिक्रिया मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर अध्यक्ष दीपक करंदीकर यांनी दिली आहे.

तर पायाभूत सुविधा मध्ये १० लाख कोटींची तरतूद केली गेली आहे. तसेच ग्रामीण भागासाठी आणि शेतीसाठी चांगल्या तरतुदी केल्या गेल्या आहेत. तूट जितकी कमी तितके चांगले हे या बजेट मध्ये दिसून आले.

लघु उद्योगांसाठी ९००० कोटी रुपयाची तरतूद केली गेली आहे. यंदा या निर्यातीमध्ये वाढ होईल पण मागच्या वर्षी सारखी होईल असे वाटत नाही, असे मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी सांगितले आहे.

आजच्या अर्थसंकल्पानंतर देशात काही वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत, तर काही वस्तू या स्वस्त होतील.

काय होणार स्वस्त?

  • एलएडी टिव्ही स्वस्त होणार

  • टीव्हीचे सुटे भाग

  • कॅमेरा लेन्स स्वस्त होणार

  • मोबाईल फोन टिव्ही स्वस्त होणार

  • इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार

  • लिथिअम आयन बॅटरी

  • परदेशातून आयात होणारी खेळणी, सायकल स्वस्त होणार

काय महागणार?

  • विशिष्ट ब्रॅन्डच्या सिगारेट महागणार

  • विदेशी किचन चिमण्या महागणार

  • परदेशातून आयात केलेली सोन्या-चांदीची भांडी महागणार

  • सोनं-चांदी, प्लॅटिनम महागणार

  • छत्र्या

  • एक्स-रे मशीन

  • हिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT