Uniparts India IPO sakal
अर्थविश्व

Uniparts India IPO : 30 नोव्हेंबरला खुला होणार आयपीओ, तुम्ही तयार आहात का ?

युनिपार्ट्स इंडियाचा (Uniparts India) आयपीओ पुढील आठवड्यात 30 नोव्हेंबरला खुला होऊन 2 डिसेंबरला बंद होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

युनिपार्ट्स इंडियाचा (Uniparts India) आयपीओ पुढील आठवड्यात 30 नोव्हेंबरला खुला होऊन 2 डिसेंबरला बंद होणार आहे. त्याच वेळी, हा आयपीओ 29 नोव्हेंबरला एका दिवसआधी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल.

कंपनी पुढील काही दिवसांत आपल्या शेअर्सची किंमत जाहीर करेल. युनिपार्ट्स इंडियाच्या आयपीओद्वारे, कंपनीचे प्रमोटर आणि विद्यमान गुंतवणूकदार सुमारे 1.44 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवतील. ( Uniparts India IPO will open on 30 November)

प्रमोटर्समध्ये करण सोनी 2018 सीजी-एनजी नेवाडा ट्रस्ट, मेहर सोनी 2018 सीजी-एनजी नेवाडा ट्रस्ट आणि पामेला सोनी त्यांचे स्टेक विकतील. दुसरीकडे, अशोका इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज आणि अंबादेवी मॉरिशस होल्डिंग्ज सुमारे 93 लाख शेअर्सची विक्री करून कंपनीतून बाहेर पडतील.

कंपनी काय करते ?
यूनिपार्ट्स इंडिया ही 25 हून अधिक देशांमध्ये उपस्थिती असलेली ग्लोबल कंपनी आहे. ही कंपनी इंजिनिअरिंग सिस्टम्स आणि सॉल्यूशन्स प्रदान करते. शिवाय कृषी, बांधकाम, फॉरेस्ट्री आणि मायनिंग (CFM) कामात ऑफ-हायवे मार्केटला सिस्टम आणि कंपोनेंट्सचा सर्वात मोठी सप्लायर आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT