जुलैमध्ये UPI (Unified Payments Interface)द्वारे व्यवहारांनी विक्रमी सहा अब्जांचा टप्पा ओलांडला. या कालावधीत एकूण 10.63 लाख कोटी रुपयांचे UPI व्यवहार झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जुलैमध्ये UPI द्वारे झालेल्या विक्रमी व्यवहाराचे वर्णन उल्लेखनीय यश असल्याचे केले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून अर्थव्यवस्था पारदर्शक करण्याच्या लोकांच्या सामूहिक संकल्पामुळे हे साध्य झाले आहे. विशेषत: कोरोना महामारीच्या काळात डिजिटल पेमेंटची मदत झाली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ट्विटला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी ही माहिती दिली आहे. सीतारामन यांनी ट्विटरवर लिहिले की, “या वर्षी जुलैमध्ये UPI द्वारे केलेल्या व्यवहाराचा रेकॉर्ड 6 अब्ज पेक्षा जास्त झाला आहे. 2016 नंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे."
UPI व्यवहारामद्धे होत आहे वाढ
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, व्हॉल्यूमच्या बाबतीत UPI व्यवहारांमध्ये महिना-दर-महिना 7.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूल्याच्या बाबतीत, त्यात 4.76 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. UPI व्यवहारांमध्ये वर्षानुवर्षे जवळपास दुप्पट वाढ झाली आहे, तर मूल्यानुसार व्यवहार दरवर्षी 75 टक्क्यांनी वाढले आहेत.
डिजिटायझेशन धोरणात मदत
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने मार्च 2022 मध्ये अहवाल दिला होता की, डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ झाली आहे. आर्थिक क्षेत्र आणि अर्थव्यवस्था डिजीटल करण्याच्या सरकारच्या धोरणामुळे हे शक्य झाले आहे.
2018-19 मध्ये डिजिटल पेमेंट व्यवहारांचा आकडा 3,134 कोटी रुपये होता. 2020-21 मध्ये ते 5,554 कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 7,422 कोटी रुपये झाला आहे.
BHIM UPI ला विशेष पसंती
28 फेब्रुवारी 2022 पर्यंत BHIM UPI द्वारे 8.27 लाख कोटी रुपयांचे विक्रमी 4.53 अब्ज व्यवहार झाले आहेत. BHIM UPI ला विशेष पसंती मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.