Whisky Import Sakal
अर्थविश्व

Whisky Import : भारतीयांना स्कॉचची भुरळ; भारत स्कॉच व्हिस्कीची सर्वात मोठी बाजारपेठ; 'या' देशालाही टाकले मागे

देशातील लोकांमध्ये महागडी दारू पिण्याचा ट्रेंड वाढत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Scotch whisky Market : देशातील लोकांमध्ये महागडी दारू पिण्याचा ट्रेंड वाढत आहे. यामुळेच भारत फ्रान्सला मागे टाकत ब्रिटनमधील स्कॉच व्हिस्कीची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे.

2022 मध्ये ब्रिटनमधून भारताच्या स्कॉच व्हिस्कीच्या आयातीत 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्कॉटलंडमधील एका मोठ्या उद्योग संस्थेच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 219 दशलक्ष 700 मिली बाटल्या आयात केल्या होत्या, तर फ्रान्सने 205 दशलक्ष बाटल्या आयात केल्या होत्या.

गेल्या दशकात भारतीय स्कॉच बाजार 200 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. यासह भारताने स्कॉच व्हिस्कीच्या आयातीत फ्रान्सला मागे टाकले आहे.

स्कॉच व्हिस्की असोसिएशन (SWA) ने शुक्रवारी सांगितले की, दोन अंकी वाढ असूनही, भारतातील एकूण व्हिस्की मार्केटमध्ये स्कॉच व्हिस्कीचा केवळ दोन टक्के वाटा आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारात व्हिस्कीची आयात हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

सध्या भारतात स्कॉच व्हिस्कीच्या आयातीवर 150 टक्के शुल्क आहे. दोन्ही देशांमधील एफटीए करारामुळे स्कॉटलंडच्या व्हिस्की कंपन्यांना भरपूर फायदा मिळू शकतो. SWA वर विश्वास ठेवला तर, पुढील पाच वर्षांत त्यांना अतिरिक्त एक अब्ज पौंड वाढ दिसू शकते.

व्हिस्कीची निर्यात रेकॉर्ड :

गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली. या काळात संपूर्ण जगाला 6.2 अब्ज पौंड व्हिस्कीची निर्यात झाली, हा एक विक्रम आहे. प्रथमच हा आकडा सहा अब्ज पौंडांच्या पुढे गेला आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

गेल्या वर्षीच्या तुलनेत 37 टक्के वाढ झाली आहे. हे ब्रिटनच्या सर्वात मोठ्या निर्यातींपैकी एक आहे. बहुतेक स्कॉच व्हिस्की ब्रिटनमधून अमेरिकेत निर्यात होते.

स्कॉटलंडमधून US मध्ये 105.3 कोटी डॉलर किंमतीची व्हिस्की निर्यात करण्यात आली. या काळात 28.2 कोटी पौंड किंमतीची व्हिस्की भारतात पाठवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Mohol News : शेततळ्यात पाय घसरून पडून विवाहितेचा मृत्यू

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन मोड, प्रत्येक घडामोडीवर करडी नजर; 'असा' असेल प्लॅन

Maratha Reservation : मुंबई आंदोलनासाठी मंगळवेढ्यातून तिघांची सायकलवारी

SCROLL FOR NEXT