petrol diesel price
petrol diesel price 
अर्थविश्व

Petrol Diesel Price : गाडी स्टार्ट करण्यापूर्वी एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर

सकाळ ऑनलाईन टीम

Price Of Petrol Per Litre Today :  भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) ने सोमवारनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणतही वृद्धी केलेली नाही. पण यापूर्वी इंधन दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. परिणामी मागील दोन वर्षातील उच्चांक गाठत पेट्रोल दर नव्वदी पार नोंद झाले होते. सध्याच्या घडीला राजधानी दिल्लीतील पेट्रोल दर 83.71 रुपये आणि डिझेलचे दर 73.87 रुपये प्रति लीटर इतका आहे. 20 नोव्हेंबरपासून 15 टप्प्यात इंधन दरात वृद्धी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती (Crude Oil) वाढल्या आहेत.  WTI कच्च्या तेलाचे दर 0.44 टक्क्यांनी वाढत 45.72 डॉलरवर पोहचले असून ब्रेंट क्रूड ऑयल (Brent Crude Oil) चे दर 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 49.06 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहेत.  

आज देशातील महानगरीत काय आहेत  इंधनाचे दर 
 

दिल्ली- पेट्रोल 83.71 रुपये आणि डिझेल 73.87 रुपये प्रति लीटर 
मुंबई- पेट्रोल 90.34 रुपये आणि डिझेल 80.51 रुपये प्रति लीटर
कोलकाता- पेट्रोल 85.19 रुपये आणि डिझेल 77.44 रुपये प्रति लीटर 
चेन्नई- पेट्रोल 86.51 रुपये आणि डिझेल 79.21 रुपये प्रति लीटर 
नोएडा- पेट्रोल 83.67 रुपये आणि डिझेल 74.29 रुपये प्रति लीटर 
लखनऊ- पेट्रोल 83.59 रुपये आणि डिझेल 74.21 रुपये प्रति लीटर 
पटना- पेट्रोल 86.25 रुपये आणि डिझेल 79.04 रुपये प्रति लीटर 
चंदिगडः पेट्रोल 80.59 रुपये आणि डिझेल 73.61 रुपये प्रति लीटर 
 
प्रत्येक दिवशी बदलतात इंधनाचे दर 

प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता इंधनाच्या दरात बदल होत असतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी (उत्पादन शुल्क), डिलर कमिशन आणि अन्य कर मिळून तेलाच्या किंमती या दुप्पट होत असतात.  

प्रत्येक दिवशी बदलणारे दर पाहायचे कसे? 

तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून ज्या त्या दिवसाचे नवीन दराचे अपडेट्स मिळवू शकता. इंडियन ऑयलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, RSP च्यासोबत आपल्या शहराचा कोड टाइप करुन 9224992249 नंबर वर SMS करुन तुम्हाला इंधनाच्या दराची माहिती मिळवता येते. प्रत्येक शहराचा कोड हा वेगळा असतो.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT