Captain Haridas Kondiram Salunkhe
Captain Haridas Kondiram Salunkhe  esakal
Blog | ब्लॉग

मराठा बटालियनला आतंकवादी घुसखोरी करणार असल्याची खबर मिळाली अन्..

प्रशांत घाडगे

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पाला-पाचोळ्याचा आवाज जवानांच्या कानावर पडताच..

जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये (Poonch Sector) पिंडीगली जंगलात ७ मराठा बटालियनला भारतीय हद्दीत आतंकवादी घुसखोरी करणार असल्याची खबर मिळाली. बटालियनच्या जवानांनी सायंकाळच्या सुमारास जंगलात आंबूस लावण्यास सुरुवात केली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पाला-पाचोळ्याचा आवाज जवानांच्या कानावर पडताच आठ ते दहा तास आंबूस लावलेल्या जवानांनी अतिरेक्यांच्या दिशेने गोळीबार करून पाच अतिरेक्यांना यमसदनी पाठविले. १९९६ मध्ये पिंडीगली ऑपरेशनचे नेतृत्व करत होते, सातारा तालुक्यातील बोरगावचे ऑनररी कॅप्टन हरिदास कोंडिराम साळुंखे Captain Haridas Kondiram Salunkhe (निवृत्त)...

देशाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय जवान (Indian Army) सीमेवर अहोरात्र पहारा देतात. भारतीय हद्दीत अतिरेक्यांचा सर्वाधिक धोका जम्मू व काश्‍मीरमधील पुंछ, राजौरी, अनंतनाग, बांदीपुरा, नौशेरा आदी सेक्टरमध्ये आहे. या ठिकाणी अतिरेकी वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. या भागात अनेक वर्षे सेवा केलेल्या हरिदास साळुंखे यांनी दोन ऑपरेशनचे नेतृत्व केले. तर पाच ते सहा ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. १९८२ मध्ये ते बेळगाव येथे मराठा लाइट ईन्फन्ट्रीमध्ये भरती झाले. त्या ठिकाणी ट्रेनिंग पूर्ण करून १९८२ मध्ये कारगिल या ठिकाणी पोस्टिंग झाली. त्यानंतर १९८४ ते १९९५ या कालावधीत त्‍यांनी गुरुदासपूर (पंजाब), गंगानगर (राजस्थान), दार्जिलिंग (Darjeeling) या ठिकाणी सेवा बजावली. या काळात त्यांना लान्स नाईक, नाईक व हवालदारपदी बढती मिळत गेली. त्यानंतर १९९६ मध्ये त्यांचे जम्मूतील पुंछ या ठिकाणी पोस्टिंग झाले. या भागात आक्रोडच्या बागा व चीडची उंचच-उंच झाडे असल्याने रात्रीच्या सुमारास ऑपरेशन करताना असंख्य समस्यांचा सामना करावा लागला. या ठिकाणी पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी पिंडीगली ऑपरेशनचे नेतृत्व केले. त्यानंतर शहापूर ऑपरेशनमध्ये त्यांच्या बटालियनने भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. या काळात सात मराठा बटालियनचे (Maratha Battalion) कमांडिंग ऑफिसर होते, युद्धसेवा मेडलप्राप्त हेमंत महाजन.

दरम्यान, १९९८ मध्ये सातरा ऑपरेशमध्ये मराठा लाइट इन्फंट्रीच्या (Maratha Light Infantry) युनिटवर हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच तिरेक्यांबरोबर चकमक झाली. यामध्ये पाकिस्तानच्या पाच अतिरेक्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जुलै १९९८ मध्ये हरिदास साळुंखे यांना नायब सुभेदारपदी बढती मिळून अंदमान या ठिकाणी बदली झाली. १९९९ मध्ये भारत-पाकिस्तान कारगिल युद्ध (India-Pakistan Kargil War) झाले. याप्रसंगी समुद्रामार्गे हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी नेव्हीच्या बटालियनसमवेत गोवा या ठिकाणी गस्त घालण्यासाठी चार महिन्यांसाठी नियुक्ती झाली. पुन्हा २००१ ते २००३ या काळात कारगिल येथे बर्फसदृ‍श भागात बदली झाली. या दरम्यान त्यांना सुभेदारपदावर बढती मिळाली. या ठिकाणी काम करताना अनेकदा बर्फाचे डोंगर घसरून दुर्घटना घडल्या. यामध्ये त्यांच्या बटालियनचे दोन जवान हुतात्मा झाले होते. २००३ ते २००६ या कालावधीत त्यांनी दिल्ली या ठिकाणी सेवा बजावली. २००६ नंतर त्यांची पुन्हा जम्मू-काश्‍मीर भागातील उरी सेक्टरमध्ये बदली झाली. या ठिकाणी लाचीपुरा जंगलात मराठा बटालियनने ऑपरेशनमध्ये तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर सुभेदार मेजरपदावर त्यांना बढती मिळाल्यानंतर २००८ ते २०१० या काळात त्यांनी पुण्यात सेवा बजावली. २०१० मध्ये त्यांची राजौरी या ठिकाणी बदली झाली. या दरम्यान २६ जानेवारी २०१२ रोजी ऑनररी लेफ्टनंट तर १५ ऑगस्ट २०१२ मध्ये ऑनररी कॅप्टनपदी बढती मिळाल्यानंतर ३० नोव्हेंबरला ते सेवानिवृत्त झाले.

हायलाउट पकडले

१९९७ मध्ये पुंछ येथे पोस्टिंग असताना जंगल हडीबुड्डा जंगलात सात मराठा बटालियनने अतिरेक्यांचे हायलाउट (शस्त्रसाठा) मोठ्या प्रमाणात पकडला होता. त्याच काळात बटालियनने तीन ऑपरेशनमध्ये आठ अतिरेक्यांना यमसदनी पाठविले होते. या कामाची दखल घेऊन ७ मराठा बटालियनला चीफ ऑफ आर्मी स्टाफ व नॉर्दन कमांडतर्फे गौरविण्यात आले.

दिल्‍लीत राजपथावर सहभाग

हरिदास साळुंखे २६ जानेवारी २००१ मध्ये दिल्लीतील राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाले होते. या दरम्यान त्यांना मराठा बटालियनचे पहिले थळ सेनाध्यक्ष जनरल जे. जे. सिंग यांना गार्ड सन्मान देण्याचा मान मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT