Dr Shantanu Abhyankar 
Blog | ब्लॉग

संसार सार 

डॉ. शंतनू अभ्यंकर

सीताहरणाची कथा. अगदी अथ:पासून इति:पर्यंत माहिती असलेली; पण तरीदेखील अशा पद्धतीने सादर झाली, की काळजाचा ठाव घेतला त्या कलाकृतीनी. त्यातला लक्षात राहिला तो रावण! 
नांदी आणि गणवंदना झाल्यानंतर वाद्यांच्या गजरात आला, की रावण! काय त्याची चाल; दाणदाण पावले टाकत, मोठ्या आवाजात गर्जना करत, हात असे दोन्हीकडे कमरेवर ठेवलेले, या एवढाल्या मिशा, मोठे मोठे डोळे गरागरा फिरवत तो आला आणि किंचाळायला लागला. म्हणाला "शूर्पणखेला घेऊन या, ती का आक्रंदन करते आहे, ते मला पाहायचे आहे.' आपल्या बहिणीबद्दलची तळमळ अचानक त्याच्या चेहऱ्यावर उमटली. अभिनय खरंच देखणा होता या रावणाचा. शूर्पणखेची अवस्था पाहून विव्हल झालेला रावण. मायावी मारीचाला आपल्या कटात सामील करून घेतानाचा कारस्थानी रावण. साळसूदपणे सीताकुटीशी भीक्षा मागतानाचा यतिवेषधारी साधू रावण आणि जटायुशी त्वेषानी लढतानाचा लढवैय्या रावण. असे सारे नवरस भाव या दशाननाने आपल्या एकाच चेहऱ्यावर झरझर उमटवले आणि उतरवले. ते पाहून थक्क व्हायला झालं. 


रामायणाच्या कुठल्याही खेळात एकूणच रावण जास्त भाव खाऊन जातो. रावण बिच्चारा माणूस आहे. त्याला क्षोभ आहे, लोभ आहे, माया आहे, असूया आहे. त्याच्या मनात कपट आहे, पाप आहे, प्रेम आहे; आशा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा आहे. असा सर्वगुणदोषसंपन्न आहे रावण. 
त्यामानाने रामाचा रोल अगदीच सपक. तो सर्वगुणसंपन्न. देवाचाच अवतार तो त्यामुळे सदा समशीतोष्ण. मर्त्यलोकांत रावण आपल्या आसपास दिसायची सोय आहे; पण राम? अं हं! रामायणाच्या प्रयोगात रामाला विशेष कामच नाही. मोठ्यांच्या ऊठ सूट पाया पडायचं आणि आशीर्वाद घ्यायचे, लहानांना पाया पडले रे पडले, की आशीर्वाद द्यायचे, सुटायचं एकदा इकडे बघून किंचित हसायचं, एकदा तिकडे बघून यत्किंचित हसायचं आणि इकडे रावणाचे हंसी सुद्धा दहा मजली. त्यामुळेच रामायणाच्या खेळात एकदा रावण मेला, की खेळातला राम जातो; पण ह्या खेळातला राम सुद्धा लक्षात राहिला बरं. त्याच्या एका वाक्‍याने तर हशा आणि टाळ्या दोन्ही वसूल केल्या. 

आवश्‍‍य वाचा : खरं तर हेच दुहेरी यश...

झालं असं, की ठरल्याप्रमाणे सुवर्णमृग सीतेला दिसले. त्याने तिला भुलवले. आता सीतामाईचं स्वागत चालू झालं. हे सुवर्णमृग आपल्याला हवंच आहे आणि याची कंचुकी आपल्याला कशी शोभून दिसेल, असं तिनं बोलून दाखवलं. प्रभू रामचंद्र घरी येताच त्यांना कांचनमृगासाठी कशी कशी गळ घालायची, कसं त्याना ताबडतोब मृगयेला पाठवायचं हे ती मनाशी ठरवते आहे. इतक्‍यात राम येतो. पतीदेव घरी आले म्हटल्यानंतर सीता त्याच्या पाया पडते. एकदा राम आशीर्वाद देतो. सीता दुसऱ्यांदा पाया पडते. राम पुन्हा आशीर्वाद देतो. सीता पुन्हा पाया पडते! तिसऱ्यांदा पाया पडताच राम आशीर्वाद द्यावा, की नाही या विवंचनेत पडतो. प्रेक्षकांना म्हणतो, "पतीदेव घरी आल्यानंतर पत्नीने एकदा नमस्कार करणं हे योग्य, दुसऱ्यांदा करणं हे तर पतीचं भाग्य; पण तिसऱ्यांदा नमस्कार करणं म्हणजे काहीतरी घोटाळा आहे खास!' वनवासी रामाची ही टिपण्णे गृहस्थाश्रमी प्रेक्षकांची दाद घेऊन गेली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT