Gofan Article sakal esakal
Blog | ब्लॉग

गोफण | निमंत्रितांची बैठक अन् खासदार काकांचा सूचक इशारा

Gofan Article: काका-पुतण्याच्या भेटीसाठी शेवटी एक मार्ग सापडलाच. नियोजनाची बैठक! हो नियोजनाची बैठक. याच बैठकीतून पुढचा 'राजमार्ग' निवडायचा असं ठरलं.. अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी ती बैठक ठरली होती.

संतोष कानडे

मागच्या अनेक महिन्यांपासून काका-पुतण्याची भेट काही केल्या होत नव्हती. कॅमेऱ्यांच्या तीक्ष्ण नजरा दोघांच्या 'निरागस' नात्याला खायला उठत होत्या. याला-त्याला पाठवून काही उपयोग होत नव्हता. भावनांचं योग्यप्रकारे मनोमिलन होत नव्हतं. शेवटी एक मार्ग सापडलाच. नियोजनाची बैठक! हो नियोजनाची बैठक. याच बैठकीतून पुढचा 'राजमार्ग' निवडायचा असं ठरलं.. अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी ती बैठक ठरली होती.

बैठकीचे अध्यक्ष तथा 'पुतणे' नावाने परिचित असलेले दादाराव दणगटे वेळेपूर्वीच पोहोचले. काकांना बैठकीत मानपान नसला तरी सर्वसामान्य मानपानाच्या वरती ते पोहोचलेले होते. सर्वोच्च नेते बारामतीकर काका आणि तमाम छोटे-मोठे दिग्गज नेते बैठकीत पोहोचले. आता काहीतरी खडाजंगी होणार, म्हणून उपस्थित शासकीय समूदाय जीव मुठीत धरून बसला होता. पण काका-पुतण्याचं आतल्याआत काय ठरलं होतं, कुणालाच ठाऊक नव्हतं.

काकांनी प्रश्न उपस्थित केला, ''आमच्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेमय.. कितीदा सांगितलं पण तुमचं लक्ष नाय, काय करायचं आम्ही? तुम्ही लक्ष नाय दिलं तर दुसरा कुणी येऊन समस्या सोडवायचा..''

दादाराव बोलले, ''तुमचंन् आमचं गाव येगळंयेगळंय का? दुसरा-तिसरा कसा ईल तिथं.. आपुन एकच-अहं एकत्रच समस्या सोडवू की!''

काका बारामतीकरः त्येच तर म्हणतोय आम्ही.. तुमी आता इचार कायला पाह्यजेल समस्या वाढल्यात. बरं समस्या वाढल्या म्हणून आम्ही रुसलो का? तुमीबी रुसवा दूर करा अन् या एकदाचं वाजत-गाजत..अन् सोडवा ती पाण्याची समस्या.

दादाराव दणगटेः सध्या आमी कन्फ्युजनमध्ये गेलोय.. काय करावं काय नाही ते कळंनाय. तुमीबी वरचेवर लैच जोर लावायले. थांबा की जरा... प्रदूषित पाण्याची समस्या सोडवायचा चान्स माझाय. मला घेऊ द्या त्यो. तुमी असं मध्येमध्ये जिंकत गेल्यावर कसं होणार?

काका बारामतीकरः तुमच्यासाठीच तर करतोय आमी सगळं.. तुमी म्हणालात थांबा की थांबू ना. पण तु्म्ही जरा प्रेमानं म्हणून तर बघा!

दादाराव दणगटेः तुमच्या प्रेमाचा अनुभव आहे गाठीशी.. पण आमाला आता त्ये प्रेम नकोचय. नवं प्रेम असेल तर सांगा. मग बघा कसं बारामतीचं पाणी प्युरिफायरमध्ये घालून टकाटक करतो ते.

काका बारामतीकरः नवं प्रेम तर नवं प्रेम.. काहीही प्रॉब्लेम नाहीये. नाहीतरी पाणी गोड व्हावं म्हणून तुमी तिकडे गेले असले तरी तुमचं पाणी खारट झालंय.. एवढं केलं तरी मिठ आळणीच ना? बघितलं साऱ्या लोकांनी..

दादाराव दणगटेः माहितंय मला. पण मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय.. मेन व्हायचंय मेन. त्यासाठी मी कायबी करीन.. पाण्यात तिखट टाकीन नाहीतर सोडा टाकीन.

काका बारामतीकरः (हळूच हसून) आता ते शक्य नाही.. जे व्हायचं होतं ते आधीच झालं असतं. आता उशीर झाला अन् पुढेही ते दाढीवाले तुम्हाला सत्तेचं स्वच्छ पाणी पिऊ देतील असं वाटत नाही. त्यामुळे विचार करा, हीच खरी वेळ आहे. आपलीच नदी, आपलीच विहीर अन् आपलंच गोड-गोड पाणी.. पाहिजे असेल तर या बिनदिक्कत!

दादाराव दणगटेः मी सांगतोय ना.. कन्फ्युजनय म्हणून. काय करावं काही सूचत नाहीये.. लोकांना कसं तोंड दाखवणार?

काका बारामतीकरः तोंड धुवायला तर पाणी पाहिजे! म्हणून पाणी स्वच्छ करा अन् घ्या निर्णय..

(काका-पुतण्याचा असा सूचक संवाद सुरु असताना एक कॅमेरा दिसलाच. तसं दादारावांनी खुबीने विषय वळवला)

दादाराव दणगटेः आम्ही ते करुन घेऊ.. कुणीही आम्हाला सल्ले देऊ नयेत. मुळात या बैठकीमध्ये निमंत्रितांनी बोलायचं नसतं.. कळलं? आता कुणीही निमंत्रित बोलणार नाही.

काका बारामतीकरः निमंत्रण असो किंवा नसो.. आम्ही 'तुमच्या' कल्याणासाठी बोलत राहणार, भेटत राहणार.. विचार करा यावर.

दादाराव दणगटेः बरं..बरं.. नक्कीच! प्रदूषणमुक्तीचा कार्यक्रम कधी ठेवायचा हे मी कळतो. पाणी स्वच्छ होणार म्हणजे होणार!

एवढं बोलून दादारावांनी बैठक उरकली..कारण बैठकीचा मूळ उद्देश होता चर्चेता तो झाला होता. आता दादाराव ते नवीन स्वप्न रंगवत काहीतरी निर्णय घेतील, असं काकांना वाटत होतं...

समाप्त

Santosh Kanade

Email: santosh.kanade@esakal.com

'गोफण'चे मागील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT