Gofan esakal
Blog | ब्लॉग

गोफण| काका चिडले पण नमोभाईंपुढे करणार काय?

संतोष कानडे

काका पॉवरवाले आज फारच त्रस्त होते. नमोभाईंचं सभागृहातलं भाषण ऐकल्यापासून त्यांना चैन पडत नव्हती. एरव्ही मनात काय चाललंय याचा थांगपत्ता ते चेहऱ्यालाही लागू देत नसत. पण आज परिस्थिती निराळी होती. ज्यांना बोटाला धरुन राजकारण शिकवलं त्यांनीच अशी अवहेलना केल्याने काकांना राग आला होता. तो चेहऱ्यावरही दिसत होता.

मागे काही निवडक पत्रकार परिषदा सोडल्या तर काकांना चिडलेलं कुणीही बघितलेलं नाही. शिवाय मागच्या निवडणुकीवेळी चिटकू पाहणाऱ्या एकाला त्यांनी कोपराने मागे रेटला होता, तेवढीच काय ती त्यांची हिंसक कृती. पण आज मात्र बदलत्या परिस्थितीमुळे काका जाम वैतागले होते. त्यांनी ठरवलं नमोभाईंना फोन करुन झापायचंच. मग काय फिरवला फोन...

नमोभाईः जय श्रीराम!

काका पॉवरवालेः (अडखळत) ज.जे..जय-जय! हे काय लावलंय नमोभाई.. असा पांग फेडणार का? काही पद्धत-बिद्धत असते का नाही?

नमोभाईः झाला काय पण नेमका? आमी तो तुमचा गुनगौरव केला.. तुमी तर नाईंटीन नाईंटीमध्ये नेतृत्व केले ना ठरावाचे, मग?

काका पॉवरवालेः हो पण त्याचं आत्ता काय? झालं गेलं सोडून द्यायला शिका ना राव तुम्ही. आमची काही माणसं दिलीत की तुम्हाला.. अजून काय पाह्यजेल?

नमोभाईः तुमी पायजेल तुमी? तुम्हारा आशीर्वाद रहेगा तो दिल खुश हो जाएगा

काका पॉवरवालेः छोडो ना राव.. ये चाहिए, वो चाहिए.. क्या क्या लोगे? बात को समझो जरा.. इतना मैं-मैं छोड दो अच्छा नहीं होगा. गुरु का सुनोगे नहीं?

नमोभाईः (उसळून) चलो छोड दिया. बताओ गुरु कैसा रहा हमारा भाषण?

काका पॉवरवालेः बहुत अच्छा..बहुत अच्छा. तुम्ही बोलणार म्हणजे धमाका तर होणारच ना! शेवटी कुणाच्या बोटाला धरुन शिकले तुम्ही? आमच्याच ना!

नमोभाईः छोडो साहब पुरानी बातें... आप भी ना कुछ भी दिल पे लेते हो. ये बताओ तुम्हारे आदमी तो खुश हैं ना. हमारा प्यार उनको कुछ कम नहीं पडने देगा...

काका पॉवरवालेः खुश? बहुत खुश.. जिनको आप जेल भेज रहे थे उनको मिनिस्टर बना दिया. क्या से क्या करत दिया.

नमोभाईः आपको कोई तकलीफ तो नहीं ना?

काका पॉवरलावेः कैसी तकलीफ? हम खुश हैं. जिनको जो बोलना हैं वो बोलने दो. सबको कन्फ्युजन में डालना तो हमारी पुरानी खेली..खेळी हैं

नमोभाईः चलो अच्छी बात हैं... आप खुद हमारे पार्टी में नहीं आते तो मत आओ लेकीन विपक्षीयोंका नेतृत्व आप करो, हे हमारी कामना हैं

काका पॉवरवालेः हाहाहा..हाहा... तुम्ही म्हणजे ना? तसं कसं होणार? मला वाटतंय खूप पण...

नमोभाईः पण-बिन छोडो पॉवरसाहब... आप कर सकते हो. आप कुछ भी कर सकते हो.. सबको मालुम हैं आप क्या कर सकते हो...

काका पॉवरवालेः (चिंतेत) बघतो. काय होतंय ते. नाहीतरी वयाचा मुद्दा संपलाय. त्यामुळे कुणी नाही म्हणणार नाही.

नमोभाईः बधाई हो.

असं म्हणत नमोभाईंनी फोन ठेवला. काका मात्र विचारात पडले होते. विरोधकांचं नेतृत्व केलं सगळे दोन्ही हाताचे आणि पायाचेही बोटं तुपात जातील, हे त्यांना ठाऊक होतं. त्यांचे 'ते' दिल्लीतलं अधूरं स्वप्न पूर्ण होण्याची एक किलकिली आशा निर्माण झाली होती. या आशेच्या नादात त्यांनी फोन कशासाठी केला होता, हे विसरुन गेले...

मागील सर्व गोफण वाचण्यासाठी खाली लिंक दिल्या आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT