Richa Chadha: गलवानमध्ये काय सुरुयं.....गलवान शांत आहे का... सगळ्यात महत्वाचं म्हणजे गलवान 'बलवान' आहे का.... काही दिवसांपासून गलवानमध्ये जे घडलं त्यावरुन त्याची चर्चा सुरु झाली....त्यावर कुणीच काही बोललं नाही.... बोलली ती रिचा.....आणि त्यानंतर जे घडलं त्यामुळे आता सारा देश तिला धारेवर धरतोय.....असं काय म्हणाली रिचा.....पहिल्यांदा ते पाहू.....
भारत सरकारनं आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे.... असं लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले होते.... याच प्रतिक्रियेसंदर्भातील ट्वीट रिचानं रिट्वीट करत.... “गलवान सेज हाय” म्हणजेच गलवान तुमच्याकडे पाहतंय..... अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली होती......
हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
रिचाच्या त्या प्रतिक्रियेनं सोशल मीडियावर नुसता राडा सुरु झालाय....जो तो रिचाला ट्रोल करतोय.....रिचा जे बोलली त्यावरुन बॉलीवूडमधील खिलाडी अक्षय कुमार, केके मेनन आणि आता अनुपम खेर यांनीही रिचाचे कान टोचले आहेत..... दुसरीकडे रिचाच्या चाहत्यांनी तिला जाणीवपूर्वक ट्रोल केले जातेय....असे म्हटले आहे.....हेच वक्तव्य जर कंगनानं केलं असतं तर.....रिचाचं गेल्या महिन्यात झालेलं अभिनेता अली फझलसोबत झालेलं लग्न.....यामुळे ती अनेकांच्या रडारवर असल्याचे बोलले जातेय...
रिचानं तिच्या ट्विटमध्ये आपल्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास आपण जाहीर माफी मागतो असे म्हटले आहे.....याशिवाय भारतीय सैन्याचा कोणत्याही प्रकारे अपमान करण्याचा आपला उद्देश नव्हता. असेही तिनं म्हटलं आहे.....माझ्या घरात लष्करात काम केलेली माणसं आहेत....माझे आजोबा हे लष्करात होते.....तेव्हा मी सैन्यांचा अपमान कसा काय करेल...असा प्रश्न रिचानं यावेळी उपस्थित केला आहे...
ज्यांनी रिचाची बाजू घेतलीय त्यांनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय....पण रिचाचं खरचं चुकलं का.....ती असं का बोलली...हे कुणीही विचारत नाहीये.....रिचा ही एक संवेदनशील अभिनेत्री आहे.....तिनं केलेले चित्रपट पाहिल्यास त्यामध्ये ती एका वेगवेगळया सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या विषयांवर व्यक्त होताना दिसते....त्यामुळे ती इतक्या सहजपणे टोकाचं विधान करेल....असं वाटत नाही....अशी भावना तिच्या चाहत्यांची आहे...... चाहते तिच्या बाजूनंच बोलणार असं म्हटलं तरी.... गलवानच्या दुसऱ्या बाजूवर कुणी बोलणार आहे की नाही....? असा प्रश्न उभा राहतोच की....
सकाळचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा......याशिवाय दिवसभरातील वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सकाळ डिजिटला क्लिक करायला विसरु नका.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.