Saina Nehwal And PM Modi
Saina Nehwal And PM Modi  File Photo
Blog | ब्लॉग

BLOG : PM मोदींसाठी कायपण! गडबडलेल्या फुलराणी विरुद्ध एक कडक स्मॅश!

सुशांत जाधव

हिंदू खतरे में है! अशी टुम वाजवणाऱ्यांचा दुसरा अंक पंजाबमध्ये (Punjab) पाहायला मिळाला. 15 लाखाच्या आमीषानं बँक अकाउंट ओपन करणाऱ्यांना अजून अक्कल म्हणजे नेमक काय हे कळलेलं नाही. त्याचा बूस्टर डोस (Booster Dose) यायला किती वेळ लागेल याचही उत्तर सध्याच्या घडीला कोणताही शास्त्रज्ञ देऊ शकेल, असं वाटत नाही. पण आपण काय बघतोय आणि काय बोलतोय यात तारतम्य असायला हवे. देशासाठी पदक जिंकणाऱ्या व्यक्तीकडून (Medal Winner Icon Player) तरी किमान तशी अपेक्षा नसते. तुमचं मत मांडा. पण मोदींसाठी कायपण! या टॅग लाईन खाली घडलंय एक आणि तुम्ही बोलताय भलतचं असं करुन कसे चालेल?

सायना नेहवाल (Saina Nehwal ) हे बॅडमिंटन (Badminton) क्षेत्रातील एक मोठ नाव. बॅडमिंटनमध्ये इंडोनेशिया, चीन, डेन्मार्क यांचा दबदबा आहे. त्यांना टक्कर देऊ शकतो हे सायना नेहवालनं (Saina Nehwal ) दाखवून दिलं. पुढे अन्य काही खेळाडूंसह पीव्ही सिंधूही (PV Sindhu) घडली. पण बॅडमिंटनमध्ये 'अच्छे दिन' दाखवणारी सायना (Saina Nehwal ) कधी बिघडली ते कळलंच नाही. गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे सायनाची कामगिरी ढासळलीये. तिला ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरता आले नाही. कोर्टमधील आपली जादू संपतीये अस दिसत असल्यामुळेच कदाचित ती राजकीय कोर्टच्या दिशने कलली. याच तिला स्वातंत्र्यही आहे. पण फुलराणीनं जी गोष्ट घडली नाही ती सांगण्याचा प्रयत्न करुन 'नाव मोठ लक्षण खोट' या म्हणीची आठवण करुन दिलीये.

तुम्ही कोणाच्या गोटातील आहात? यावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही. पण तुमचा ज्यावेळी चाहतावर्ग असतो त्यावेळी तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागते. तुमचा प्रत्येक शब्द 'कॅरी' केला जातो. म्हणजे उचलून धरला जातो. बॅडमिंटनमध्ये 'कॅरी' हा शब्द खेळाडूच्या तांत्रिकदृष्ट्या चुकीसाठी वापरला जातो. सायनाच्या बाबतीतही तेच घडलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यात जो प्रकार घडला (PM Modi Security Breach In Punjab ) त्याबद्दल सायना नेहवाल व्यक्त झाली. ती व्यक्त झाली त्यात अयोग्य असं काहीच नाही. पण तिन जी 'मन की बात' सांगितली ती खटकणारी होती. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला झाला असा शब्दप्रयोग तिच्या ट्विटमध्ये पाहायला मिळाला.

बॅडमिंटनच्या कोर्टवर प्रतिस्पर्ध्याला बॅकफूटवर ढकलून पॉइंट्स मिळवण्यासाठी खेळाडू अनेक शॉट्सचा प्रयोग करत असतो. मग त्यात सर्व्ह, क्लीयर, स्मॅशेस आणि ड्राइव्ह अॅण्ड ड्रॉप्सचा या तांत्रिक फटकेबाजीचा समावेश असतो. मोदींच्या ताफ्यासंदर्भात पंजाबमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर सायना नेहवाल क्लीयर भूमिका घेण्यात चुकली. आता बॅडमिंटनमध्ये क्लीयर शॉट्सचे दोन प्रकार आहेत. एक प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करण्याचा ज्याला ऑफेन्सिव क्लीयर असे म्हटलं जाते. आणि दुसरा डिफेन्सिव. या गोष्टीत बॅलन्स असणं खूप गरजेच आहे.

बॅडमिंटनच्या कोर्टवर जसा समतोल राखणं महत्त्वाचं आहे अगदी तसच एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देताना गोष्ट समजून घेऊन समतोल साधला तर आपल्याला पॉइंट्स मिळेल, हे लॉजिक सायनानं अप्लाय करायला हवं होते. पण कदाचित भाजपमध्ये लॉजिकवाली मॅजिक चालत नसेल. त्यामुळेच तिने अनबॅलन्सिंग फटका खेळला. गडबडीनं खेळला का गडबडून हा आणखी वेगळा मुद्दा. परिणामी सोशल मीडियावर नेटकरी तिच्याविरुद्ध कडक स्मॅशेसचा मारा करताना दिसताहेत. त्यात चुक अस काहीच नाही. तुम्ही चुकीचा फटका खेळल्यावर नेटकरी आक्रमक झाले तर त्यांच तरी चुकतंय कसं म्हणायच. थोडक्यात मोदींसाठी कायपण करण्याच्या नादात सायनाचा गेम प्लॅन फसलाय. झालं गेलं ठिकये पण इकडपण एखादा मेडल मिळवण्याच्या नादात उगाचच लोकांना आणि स्वत:ला कुठतरी दुसरीकडे भटकू देऊ नकोस. आता पुढच्या वेळी तरी नीट खेळ.

सुशांत जाधव

Email - sushant.jadhav@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT