Citizen Journalism

कबुतराद्वारे पाठविले महामस्तकाभिषेकाचे वृत्त

संजय उपाध्ये

श्रवणबेळगोळच्या बाहुबली मूर्तीवरील महामस्तकाभिषेकाचा लिखित उल्लेख हा इ. स. १३९८ या वर्षी आढळतो. या वर्षीचा शिलालेख आजही उपलब्ध आहे. हा सोहळा पंडिताचार्य यांच्या अध्यक्षतेखाली झाल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर थेट इ. स. १६१२ ला महामस्तकाभिषेक केल्याची नोंद आहे; पण इ. स. ९८१ पासून सलग, तपशीलवार नोंदी मिळत नाहीत.

महामस्तकाभिषेकाच्या लिखित नोंदी अशा -

  •  १६१२ - शांतीवर्णी यांच्या नेतृत्वाखाली सोहळा
  •  १६५९  - म्हैसूरचे महाराजा दोड्ड देवराजा वडेयर
  •  १६७७ - म्हैसूरचे महाराजा चिक्कदेवराय वडेयर यांच्या  जैन मंत्री विशालाक्का पंडित
  •  १८००, १८२५ - म्हैसूरचे महाराजा कृष्णराजा वडेयर (तिसरे)
  •  १८७१ - कॅप्टन जे. एस. एफ. मॅकेंझी
  •  १८८७ - लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर
  •  १९००, १९१०, १९२५, १९४०, १०५३, १९६७, १९९३, २००६ या वर्षी सोहळा झाला.
  •  १९८१ -  मूर्तीला हजार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष सोहळा.

विसाव्या शतकातील १९१० च्या महामस्तकाभिषेक सोहळ्याचे वृत्त दुसऱ्या दिवशी तातडीने छापून आले. इंग्रज अधिकारी आणि मद्रास मेलचे रिपोर्टर जी. एफ. एडवर्डस्‌ यांनी आपल्या कबुतराचा वापर केला. कबुतराद्वारे ३० मार्च १९१० ला महामस्तकाभिषेक सोहळ्याची बातमी त्यांनी मद्रास मेल वर्तमानपत्राकडे पाठवून दिली. श्रवणबेळगोळ ते मद्रास (आताचे चेन्नई) हे सुमारे ५०० किलोमीटरचे अंतर कबुतराने केवळ तीन तास आणि ४० मिनिटांत कापले आणि मद्रास मेल ऑफिसात पोचले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मार्च १९१० ला महामस्तकाभिषेकाची बातमी छापून आली. ही एक या सोहळ्यातील अविस्मरणीय अशी घटना घडली. दुष्काळ, युद्ध, सामाजिक, राजकीय घटनांमुळे काही सोहळे हे १२ वर्षाऐवजी १५-१७ वर्षांनी झाले आहेत.

संबंधीत बातम्या - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT