Citizen Journalism

‘अहिंसेपासून सुख, त्यागापासून शांती’

संजय उपाध्ये

श्री चामुंडराय यांनी कोरून घेतलेली बाहुबलींची मूर्ती हजारो वर्षे शांतीचा संदेश देत राहील. मानवकल्याणासाठी या मूर्तीचे अतुलनीय योगदान असू दे, अशी मनीषा चामुंडराय यांची होती. मूर्ती कोरण्यामागे हाच हेतू होता. त्याशिवाय या संदेशाची प्रचीती येण्यासाठी बारा वर्षांनंतर महामस्तकाभिषेक महोत्सवाची योजना त्यांनीच आखली.

मूर्तीची निर्मिती झाल्यानंतर पहिलाच महामस्तकाभिषेक सोहळा त्यांनीच घडवून आणला. उपस्थित सर्व श्रावक-भाविकांनी मूर्तीवर अभिषेक केला; पण दूध काही पायापर्यंत आले नाही. महामस्तकाभिषेक अपूर्ण राहिला. सारे चिंतेत पडले. त्याचवेळी छोट्याशा कुंभात थोडेसे दूध घेऊन आपल्यालाही मूर्तीवर अभिषेक करायला मिळेल, अशा आशेने एक ज्येष्ठ सामान्य महिला उभी होती. त्या गुल्लिकायजी होत्या. द्वारपाल, रक्षक, मंत्री, इतर मान्यवरांकडे गयावया करत गुल्लिकायजी वर गेल्या व बाहुबलींच्या महामस्तकावर आपल्या छोट्याशा कुंभाने अभिषेक केला आणि महामस्तकाभिषेक पूर्ण झाला. या क्षेत्रातील कुष्मांडिनी ही अधिदेवताच गुल्लिकायजी होत्या, अशी कथा आहे.

यंदाच्या लोगोवर हीच कथा आहे. गुल्लिकायजी दूध ओतत आहेत आणि भगवान बाहुबली दुधात चिंब न्हाऊन निघालेत. मूर्तीच्या कुरळ्या केसातून, कपाळावरून, कानाच्या पाळीतून खांद्यावर दुधाची धार पडत आहे. नाकावरून, ओठावरून दुधाच्या धारा ओघळत आहेत आणि येथेच गुल्लिकायजींची मनीषा पूर्ण झाली आहे.

लोगोच्या पार्श्‍वभूमीवर भव्य पायाड (स्कफोल्डिंग) आहे. गुल्लिकायजींच्या मागे अष्टौप्रहर शांतीचा संदेश देणारे अष्टचक्र आहे. तीनस्तरीय छत्र आकाशाकडे लक्ष वेधते. खाली समृद्धीचे चिन्ह म्हणून चार कलश असून त्यावर सुफळ आहेत. डावीकडून मूर्तीचे जगातील स्थान दाखविण्यासाठी कलशावर हासन जिल्हा, कर्नाटक राज्य, भारत देश आणि जग असे नकाशे आहेत. १९१० ला कबुतराद्वारे सोहळ्याची बातमी पाठविली. त्याचे स्मरण करण्यासाठी कबूतर वृत्त घेऊन उडत असतानाचे चित्र आहे. मधोमध ‘महामस्तकाभिषेक महोत्सव २०१८’ ही कन्नडमध्ये अक्षरे आहेत. हीच अक्षरे देवनागरी लिपीत आहेत. त्याच्या खाली ‘अहिंसेपासून सुख, त्यागापासून शांती’ असा संदेश कन्नड आणि हिंदीत आहे. शेवटी कन्नड आणि इंग्रजीत ‘श्री सुक्षेत्र श्रवणबेळगोळ’ असे लिहिले आहे. दोन हत्ती सर्वांचे स्वागत करत आहेत.

‘महामस्तकाभिषेक हा देशाबरोबर जगाचा धार्मिक सोहळा आहे. सर्वधर्मीय महोत्सव आहे. विश्‍वशांतीसाठी हा महोत्सव महत्त्वाचा असून शांती आणि अहिंसेचा प्रचार होण्यास मदत होणार आहे.

- स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, श्रवणबेळगोळ.

बाहुबली महामस्तकाभिषेकाशी संबंधीत बातम्या व लेख- 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT