Queen Elizabeth shifted to windsor because of Coronavirus
Queen Elizabeth shifted to windsor because of Coronavirus  
कोरोना

Coronavirus : राणी एलिझाबेथलाही कोरोनाचा धसका; सोडला राजमहल

वृत्तसंस्था

लंडन : जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची धास्ती सामान्यांप्रमाणेच दिग्गजांनाही बसली आहे. आतापर्यंत कोरानामुळे मृतांची संख्या ६ हजारांहून जास्त असून अजूनही कोरोनावरील लस उपलब्ध झालेली नाही. जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा फटका थेट ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनाही बसला आहे. त्यांना आपला राजमहल सोडून दुसऱ्याच ठिकाणी राहायला जावे लागले आहे. 

कोरोनाने चीनपाठोपाठ इटलीमध्ये थैमान घेताल आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांना कोरोनामुळे बर्मिंगहॅम पॅलेस सोडून विंडसर कॅसलमध्ये राहावे लागत आहे. एलिझाबेथ यांच्या भेटीसाठी असंख्य लोक पॅलेसमध्ये येतात. परदेशी लोकांचे पॅलेसमध्ये सतत येणं-जाणं सुरू असतं. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता तेथे जास्त आहे. तसेच राणीची ९४वा वाढदिवसही आता जवळ आला आहे. तसेच या पॅलेसमध्ये खूप ठिकाणचे कर्मचारी काम करतात. त्यामुळे त्यांना पॅलेसमध्ये न ठेवता, विंडसरमध्ये आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

लंडनमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यास राणी एलिझाबेथ व प्रिन्स फिलिपला सैंड्रिगममध्ये वेगळं ठेवण्यात येईल. सध्या राणी विंडसरमध्ये असून, तेथेही कोरोनाचा धोका जाणवल्यास राणी व प्रिन्सला पुन्हा एकदा विंडसरमधूनही हालविण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच पॅलेसमध्ये होणारे आयोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.  

लंडनमध्ये अजूनतरी कोरोनाबाधित रूग्ण सापडलेला नसून तेथील लोकांना धोका कमी आहे. तरीही सरकारने सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर युरोपमध्ये २००० हून अधिक लोकांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT