ATM Scam eSakal
Crime | गुन्हा

ATM Scam : अवघ्या तीन दिवसांत १८ राज्यांमधील २०० एटीएमवर डल्ला; २.५३ कोटींची चोरी!

या ATM चोरांची ट्रिक पाहून पोलिसही चक्रावले आहेत.

Sudesh

एका कंपनीच्या २०० एटीएम मशीनवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत देशातील १८ राज्यांमध्ये ही चोरी करण्यात आली. यातून चोरट्यांनी एकूण २.५३ कोटी रुपये काढून नेले आहेत.

ही चोरी (ATM Theft) आधीच झाली होती, मात्र आता हे प्रकरण उघडकीस आलं आहे. ८७२ एटीएम कार्डचा वापर करून २,७४३ ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून हे पैसे लुटले असल्याची माहिती कंपनीने दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या वर्षीचं प्रकरण

ही चोरी गेल्या वर्षी १२ ते १४ ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये झाली होती. कंपनीच्या गोरेगाव ऑफिसमध्ये याबाबत रिपोर्ट करण्यात आलं होतं. कंपनीने आपल्या टीमकडून याबाबत तपास केला. त्यानंतर २० डिसेंबरला वानराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अशी करायचे चोरी

या चोरांची ट्रिक काय होती, याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. "एक व्यक्ती एटीएम मशीनमध्ये डेबिट कार्ड इन्सर्ट करून ट्रान्झॅक्शन सुरू करायची. पैसे मशीनच्या डिस्पेन्सरी शटरजवळ येताच, दुसरी व्यक्ती एटीएम मशीनच्या मागून इलेक्ट्रिक वायर किंवा लॅन केबल काढून टाकायची. यानंतर पहिली व्यक्ती डिस्पेन्सिंग शटरमध्ये अडकलेले पैसे ओढून घ्यायचा." असं FIR मध्ये म्हटलं आहे.

"वायर काढून टाकल्यामुळे हे ट्रॅन्झॅक्शन कम्प्लीट न दाखवता, फेल्ड असं दाखवायचं. यामुळे डेबिट कार्डच्या बँक अकाउंटवर पैसे परत क्रेडिट व्हायचे. मात्र मशीनमधून पैसे गेल्यामुळे कंपनीला याचा भुर्दंड बसायचा." अशी माहिती समोर आली आहे.

तीन दिवसात १८ राज्यं

विशेष बाब ही होती, की अवघ्या तीन दिवसांमध्ये छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, आसाम, हिमाचल, पंजाब आणि इतर १० राज्यांमध्ये अशा प्रकारची चोरी करण्यात आली. याची एकूण रक्कम २.५३ कोटी रुपयांहून अधिक होती. कंपनीने आपल्या सर्व एटीएम मशीन्समध्ये असणारी हार्ड डिस्क तपासल्यानंतर ही माहिती समोर आली.

गुन्हेगारांचे फोटो समोर

या गुन्हेगारांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरेही निकामी केले होते. मात्र, मशीनमध्ये असलेल्या पिनहोल कॅमेऱ्यांमध्ये त्यांचे चेहरे दिसून येत आहेत. हे फोटो पोलिसांकडे जमा करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. गुन्हेगारांनी जे डेबिट कार्ड वापरले, ते बनावट बँक खाती तयार करून मिळवले असण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे गोपीनाथ यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT