Girl abused by uncle in UP
Girl abused by uncle in UP Sakal
Crime | गुन्हा

अपहरण करुन 11 वर्षे बलात्कार; प्रकरण असं आलं उजेडात

सकाळ डिजिटल टीम

देशात महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी कायदे असतानाही महिला अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. मावशीच्या नवऱ्याने अल्पवयीन तरूणीवर तब्बल ११ वर्ष अत्याचार (Girl abused by uncle in UP) केल्याचा प्रकार उघड झाला आहे. उत्तरप्रदेशातील (UP) गाझियाबाद (Ghaziabad) जिल्ह्यातील मुरादनगर पोलीस ठाण्याच्या (Muradnagar Police Station) हद्दीतील एका गावात नात्यांना काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर (Minor girl) तिच्या काकाने (मावशीचा नवरा) अपहरण करून 11 वर्षांपासून अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पिडीत मुलीने पोलिसांत तक्रार दिली असून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांत तक्रार करताना मुलीने पोलिस स्टेशन प्रभारी सतीश कुमार यांना सांगितले की, 11 वर्षांपूर्वी ती शेतात चारा आणण्यासाठी गेली असता, तिच्या काकाने तिचे अपहरण केले आणि तिला घेऊन गेले.

गेल्या 11 वर्षांपासून तो तिला बंधक बनवून तिच्यावर सतत बलात्कार करत होता. विरोध केल्यावर तो बेदम मारहाण करायचा आणि खोलीत कोंडून अनेक दिवस उपाशी ठेवायचा. आरोपीला आता तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचे आहे. तिने लग्न न केल्यास चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकीही दिली, असं मुलीनं पोलिसांना सांगितलं.

मुलीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि दिल्लीला गेली. मुलीला तिचा सख्खा भाऊ दिल्लीत सापडला. त्याने बहिणीला ओळखले. त्यानंतर मुलीने आपला त्रास कुटुंबीयांना सांगितला आणि त्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT