Fake NGO Scam Esakal
Crime | गुन्हा

Fake NGO Scam : जखमी पक्ष्याची मदत करणं पडलं महागात; मुंबईतील महिलेला बसला एक लाखांचा चुना!

अशा प्रकारची फसवणूक दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे.

Sudesh

कित्येक वेळा आपण एखाद्याचं भलं करायला जातो, आणि आपलंच नुकसान होऊन बसतं. मुंबईतील एका महिलेला नुकतीच या गोष्टीची प्रचिती आली. एका जखमी पक्ष्याची मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला तब्बल एक लाखांचा चुना लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या एका महिलेला आपल्या ऑफिसमध्ये एक जखमी पक्षी मिळाला होता. यावेळी या पक्षाची मदत करण्याचा निर्णय महिलेने घेतला. त्यासाठी तिने ऑनलाईन एनजीओचा शोध सुरू केला. गुगलवर तिला एका एनजीओचा नंबर मिळाला.

एनजीओच्या नावाने फसवणूक

या एनजीओच्या नंबरवर संपर्क केल्यानंतर तिला एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकमध्ये एक फॉर्म देण्यात आला होता. यासोबतच महिलेला एक रुपया रजिस्ट्रेशन चार्जेस मागण्यात आले. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर एनजीओकडून एक व्यक्ती पाठवू असं सांगण्यात आलं होतं. मात्र, अशी कोणतीही व्यक्ती आली नाही.

४ दिवसांनी बसला धक्का

यानंतर चार दिवसांनी महिलेला अचानक तिच्या खात्यातून ९९,९८८ रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर तिने तातडीने सायबर सेलमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल केली. तसंच, बँकेलाही याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आयटी कायद्याअंतर्गत याबाबत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या महिलेच्या बँक खात्याचे डीटेल्स मागवले आहेत, तसंच याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

खबरदारी गरजेची

काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे कस्टमर केअरचा खोटा नंबर वापरून एका महिलेची फसवणूक करण्यात आली होती. आपल्या सेट टॉप बॉक्सचा रिचार्ज करण्यासाठी या महिलेने गुगलवरूनच कस्टमर केअरचा नंबर घेतला होता. मात्र, हा स्कॅमरचा नंबर असल्यामुळे या महिलेची ८१ हजार रुपयांची फसवणूक झाली होती.

अशा प्रकारची सायबर फसवणूक दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गुगलवर काहीही शोधताना खबरदारी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT