Weekly Horoscope 28th July To 3rd August 2025  
संस्कृती

Weekly Horoscope 2025 : 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 दरम्यान होणार आहे बुधादित्य योग; या राशींची होणार प्रगती अन संपत्तीत वृद्धी

Weekly Horoscope 28th July To 3rd August 2025 : जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बुधादित्य योग तयार होतोय. याचा फायदा काही राशींना होणार आहे. जाणून घेऊया मेषपासून मीन राशीपर्यंत राशींच या आठवड्याचं राशिभविष्य.

kimaya narayan

  1. 28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान बुध आणि सूर्याच्या युतीने बुधादित्य योग तयार होईल.

  2. या योगाचा प्रभाव आर्थिकदृष्ट्या अनेक राशींना लाभदायक ठरणार आहे.

  3. मेष, कर्क, तूळ यांच्यासह इतर चार राशींनाही यामुळे उत्पन्नवाढ, गुंतवणुकीत यश व प्रगती दिसून येईल.

Marathi Weekly Horoscope : जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात म्हणजे 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 मध्ये बुधादित्य योग तयार होतोय. बुध आणि सूर्याच्या या योगामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. मेष, कर्क आणि तूळ राशीबरोबर पाच राशींना फायदा होणार आहे.

हा आठवडा प्रत्येक राशीला कसा जाणार आहे आणि कोणत्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घेऊया आर्थिक राशीफळ.

मेष रास :

आर्थिक बाबींमध्ये हा आठवडा शुभ असेल. धन वृद्धीचे उत्तम योग बनतील. व्यापारात धनप्राप्तीच्या नवीन संधी मिळतील. पण प्रवास टाळा. जर तब्येत बरी नसेल तर आता सुधारणा होऊ शकते. डाएटवर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. मन अस्वस्थ राहील.

वृषभ रास :

कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि हळूहळू प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. आर्थिक बाबींमध्ये प्रगती होईल पण हळूहळू यश मिळेल. व्यापाराबाबतीत केलेले प्रवास यशस्वी होतील ज्यामुळे मन प्रसन्न राहील. या आठवड्यात तुमच्या तब्येतीत सुधार पाहायला मिळेल. पण कौटूंबिक गोष्टींमध्ये एकटं पडल्यासारखं वाटेल. आठवड्याच्या अखेरीस सुख समृद्धीचे योग बनतील.

मिथुन रास :

कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि घरात आनंदाचं वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि कामाबाबत तुम्ही गंभीर असतात. सकारात्मक निर्णय घेतले जाऊ शकतात. या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम असेल आणि पैशांच्या अडचणीत हळूहळू सुटका होईल. जोडीदाराशी नातं घट्ट होईल. पण आठवड्याच्या अखेरीस प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागेल.

कर्क रास :

या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि मानसन्मानात प्रगती होईल. कामात कुणीतरी अनुभवी व्यक्तीची मदत होईल ज्यामुळे यश मिळेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल आणि नवीन गुंतवणुकीत यश मिळेल. व्यापारासंबंधीत यात्रेत यश प्राप्त होईल. कुटूंबात संतानविषयक एखादी आनंदाची बातमी या आठवड्यात मिळेल. पण या अथडव्याच्या अखेरीस मन अस्वस्थ असेल.

सिंह रास :

व्यापारासंबंधी एखादी यात्रा होईल. एखादी शुभवार्ता या दरम्यान समजेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. पण आर्थिक बाबींमध्ये काही अडचणी राहू शकतात. एशिअवय कोणत्याही बाबतीत केलेल्या दुर्लक्षामुळे खर्चात वाढ होऊ शकते. व्यापारबाबतीत गोष्टींमध्ये यावेळी शक्यतो प्रवास टाळा. कुटूंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतो यामुळे मन प्रसन्न असेल.

कन्या रास :

कामाच्या बाबतीत हळूहळू प्रगती होईल. कष्टामुळे कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी विरोधकांनी तुमच्या विरोधात केलेल्या गोष्टी अयशस्वी होतील. आर्थिक बाबतीत हा आठवडा सामान्य असेल. पण गुंतवणुकीच्या काळजीने मन अशांत असेल. कामाच्या निमित्ताने एखादा प्रवास होऊ शकतो. कुटूंबात शांतता असेल.

तूळ रास :

या आठवड्यात कामाच्या बाबतीत शुभ योगामुळे यश मिळेल. क्रिएटिव्ह कामांमध्ये विशेष यश मिळेल. आर्थिक बाबतीत हळूहळू प्रगती होईल आणि धनलाभ होईल. या आठवड्यात केलेल्या यंत्रांमुळे चांगली बातमी मिळेल. आठवड्याच्या अखेरीस नेटवर्किंगच्या माध्यमातून लाभ होऊ शकतो. कुटूंबात मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

वृश्चिक रास :

कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि आठवड्याच्या सुरुवातीला एखादी चांगली बातमी मिळतील. आर्थिक बाबतीत संतुलन ठेवलं तर धनवृद्धीचा योग बनेल. व्यापारसंबंधी प्रवास यशस्वी होतील. आठवड्याच्या अखेरीस कोणतीतरी चांगली बातमी मिळेल. कुटूंबातील संबंध चांगले होतील. घरातील सदस्यांची साथ मिळेल.

धनु रास :

हा आठवडा संमिश्र असेल. आर्थिक बाबतीत आठवड्याच्या मध्ये धनलाभ होईल त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापारसंबंधी प्रवास शक्यतो टाळा. या आठवड्याचा अखेरीस स्थिती चांगली असेल त्यामुळे यश मिळेल. कुटूंबाचे साहाय्य मिळेल आणि प्रेमी जीवन रोमँटिक असेल.

मकर रास :

कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. सहकारी कामात मदत करतील. व्यापारात जवळच्या व्यक्ती मदत करतील. आर्थिक बाबतीत धन वृद्धीचे योग बनतील आणि गुंतवणुकीतून लाभ प्राप्त होतील. सोबतच धन लाभाच्या अनेक संधी प्राप्त होतील. कामाच्या बाबतीत केलेल्या यात्रा चांगले परिणाम देतील. कुटूंबात चाललेल्या समस्या दूर होतील. जीवनात आनंद येईल.

कुंभ रास :

हा आठवडा आर्थिक बाबींसाठी लाभदायी असेल. धनवृद्धी होईल ज्यामुळे तुम्ही समाधानी असाल. कामाच्या बाबतीत प्रवास करण्यापूर्वी सगळी कागदपत्र नीट तपासून घ्या नाहीतर आर्थिक अडचणी उभ्या राहू शकतात. आठवड्याच्या अखेरीस कामाच्या ठिकाणी मानसन्मान प्राप्त होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल.

मीन रास :

अडकलेले पैसे परत मिळतील. कोणत्या कोर्टाच्या कामात अडकला असाल तर चांगले परिणाम मिळतील . याबरोबरच धनप्राप्तीच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. या आठवड्यात केलेल्या यात्रा यश मिळवून देतील. कामाच्या ठिकाणी या आठवड्यच्या सुरुवातीला मन अशांत राहील. पण आठवड्याच्या अखेरीस एखाद्या महिलेमुळे आयुष्यात समाधान आणि शांतता येईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

FAQs :

1. बुधादित्य योग काय असतो?
→ बुध आणि सूर्य यांची एकाच राशीत युती झाल्यास तयार होणारा विशेष योग, जो बुद्धिमत्ता, संप्रेषण व आर्थिक निर्णय सुधारतो.

2. हा योग कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम करतोय?
→ मेष, कर्क, तूळ, सिंह, कुंभ, मिथुन आणि वृश्चिक राशींना फायदा होईल.

3. हा आठवडा गुंतवणुकीसाठी योग्य आहे का?
→ होय, विशेषतः मेष, तूळ, मिथुन आणि कुंभ राशींसाठी.

4. खर्चाचा अंदाज कोणत्या राशींना घ्यावा लागेल?
→ वृश्चिक व मकर राशींना खर्च नियंत्रण आवश्यक राहील.

5. बुधादित्य योगाचा परिणाम किती काळ टिकेल?
→ साधारणतः हा प्रभाव पुढील 7-10 दिवस टिकतो, पण राशीनुसार परिणाम लांबू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Latest Marathi News Live Update: नगरपरिषद, नगरपंचायत नगराध्यक्ष आरक्षण सोडत ६ ऑक्टोबरला

Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT