Akshaya Tritiya 2023 esakal
संस्कृती

Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करू शकत नसाल तर या वस्तू घरी आणा, धनाने भरेल तिजोरी

असे मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते शुभ होते

साक्षी राऊत

Akshaya Tritiya 2023 : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. अक्षय्य तृतीया हा स्वयंभू मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे. असे मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते शुभ होते. या दिवशी जप, तपस्या आणि दान केल्याने उत्तम फळ मिळते.

अक्षय तृतीयेला अखा तीज असेही म्हणतात. यंदा अक्षय तृतीया हा सण 22 एप्रिलला शनिवारी साजरा होणार आहे. अक्षय तृतीया 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 वाजता सुरू होईल आणि 23 एप्रिल रोजी सकाळी 07.47 वाजता समाप्त होईल. अक्षय तृतीयेचा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी वाढते असे मानले जाते.

तुम्ही जरी सोने खरेदी करू शकत नसाल तरी काळजी करण्यासारखे काही नाही. सोन्याव्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या वस्तू घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोन्याव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या वस्तू घरी आणू शकता ते वाचा.

अक्षय तृतीयेला या वस्तू घरी आणा

माता लक्ष्मीला गोवऱ्या खूप आवडतात, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर या दिवशी नक्कीच गाय खरेदी करा. या दिवशी 11 कवड्या खरेदी करून त्यांची पूजा करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमची तिजोरी पैशाने भरेल.

दक्षिणावर्ती शंख

अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणावा. हा शंख दैवी मानला जातो. दक्षिणावर्ती शंखाची पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार या शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली. याला देवी लक्ष्मीचा भाऊ देखील मानले जाते. हा शंख घरात ठेवल्याने लक्ष्मीचा वास होतो. (Sanskruti)

Akshaya Tritiya 2023

एकाक्षी नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. मान्यतेनुसार, ज्या लोकांकडे एकाक्षी नारळ असेल त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते. या लोकांच्या आयुष्यात कधीच आर्थिक समस्या येत नाहीत. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरी एकाक्षी नारळ आणा.

Akshaya Tritiya 2023

पारद शिवलिंग घरात ठेवणे खूप शुभ असते. अक्षय तृतीयेला पारद शिवलिंग घरी आणून त्याची विधि व नियमानुसार पूजा करावी. पारद शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिवासोबतच लक्ष्मी मातेची कृपाही कायम राहते. हे घरात ठेवल्याने लक्ष्मी आणि देव कुबेर यांचा कायम वास होतो. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरामध्ये पारद शिवलिंग नक्की आणा.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT