Akshaya Tritiya 2023 esakal
संस्कृती

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेच्या आधीच घराबाहेर काढा 'या' गोष्टी, नाहीतर...

लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी घरातील काही वस्तू वेळीच बाहेर काढल्या पाहिजे. असे न केल्या येणारी लक्ष्मी त्याच पावलांनी माघारी जाईल

साक्षी राऊत

Akshaya Tritiya 2023 : यंदाची अक्षय्य तृतीया २२ एप्रिल २०२२ रोजी आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेलं काम अक्षय्य म्हणजेच अखंड टिकतं अशी समजूत आहे. त्यामुळेच या दिवशी चांगल्या गोष्टींची खरेदी केली जाते. बरेच लोक सोन्याचांदीची मोठी खरेदी करतात. यावेळी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी घरातील काही वस्तू वेळीच बाहेर काढल्या पाहिजे. असे न केल्या येणारी लक्ष्मी त्याच पावलांनी माघारी जाईल.

अक्षय्य तृतीयेला दान धर्माचेही विशेष महत्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत ते जाणून घेऊया.

सुकलेलं झाड

सुकलेली झाडं हा घरातला एक मोठा दोष मानला जातो. घरात काही सुकलेली झाडं असतील तर ती वाहत्या पाण्यात प्रवाहीत करावीत किंवा मातीत गाडून टाकावीत. घरात सुकलेली झाडं असल्यास माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या आधी हे काम नक्की करावं.

Akshaya Tritiya 2023

तुटलेली मोडलेली भांडी

घरात काही भांडी तुटलेल्या किंवा मोडलेल्या अवस्थेत असतील तर ती आधी घराबाहेर काढावीत. तुटलेल्या भांड्यांनी घरात नकारात्मकता येते असं म्हटलं जातं आणि तुटलेली भांडी घरात असतील तर माता लक्ष्मी तिथे येणं पसंत करत नाही कारण त्या ठिकाणी शांती नसते.

फाटलेले चपला आणि कपडे

घरामध्ये फाटलेले जोडे आणि चप्पल ठेवल्याने लक्ष्मी मातेचा कोप होतो, ज्यामुळे दारिद्र्य येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ वस्तूंची खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. अशा परिस्थितीत अक्षय्य तृतीयेच्या आधी असे कपडे आणि चप्पल घराबाहेर फेकून द्या.

झाडू

झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. झाडूबाबत शास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत, जे त्यांचे पालन करत नाहीत त्यांच्या नशीबी दुर्दैव येतं. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात तुटलेला झाडू ठेवू नका. यामुळे घरातील वातावरण दुषित होते. (Sanskruti)

दाराजवळ कचरापेटी ठेवू नका

दाराजवळ चुकूनही कचरापेटी ठेवू नका. याबरोबरच घरात खरकटी भांडी आणि न धुतलेले कपडेही ठेवू नये. त्याने घरात दरिद्री पसरते.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकी आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

Indian Bank Jobs 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ३५० पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये कोळशेवाडी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरटा जेरबंद, १० मोटरसायकली जप्त

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

SCROLL FOR NEXT