Somvati Amavsya esakal
संस्कृती

Somvati Amavsya : घरात पितृदोष असेल तर सोमवती अमावस्येला हे उपाय करा, लाभेल सुख, शांती

Pitru Dosh Upay : पितृदोष निवारणासाठी सोमवती अमावस्येला काही उपाय करणे लाभकारक ठरते.

धनश्री भावसार-बगाडे

Ashadh Somvati Amavasya Pitra Dosh Nivaran Upay In Marathi : उद्या १७ जुलै २०२३ रोजी आषाढातली अमावस्या आहे. याला कोणी गटारी अमावस्या म्हणतात तर कोण दीप अमावस्या. पण ही अमावस्या सोमवारी आल्याने याला अजून महत्व प्राप्त झाले आहे. या सोमवती अमावस्येला पितृदोष निवारणाचे काही उपाय फलदायी ठरतात.

ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार मृत पुर्वजांची नाराजी अशुभ मानली जाते. त्यामुळे घरात पितृदोष येतो. त्यांच्या अशांततेमुळे आयुष्य विस्कळीत होते, कोणत्या कामात यश मिळत नाही. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक ताण वाढतो, घरातली सुख, शांतता हरवते असं मानलं जातं. यासाठी सोमवती अमावस्येला करावयाचे काही उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया.

कालसर्प दोष - ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्यांनी भगवान शंकराची पूजा करावी. भगवान शंकराच्या पूजेसोबत रुद्राभिषेक करावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि कालसर्प दोषाचा अशुभ प्रभावही कमी होतो.

वारंवार पिंपर उगवणे - वास्तू आणि हिंदू धार्मिक शास्त्रानुसार घरात किंवा गच्चीवर पिंपळाचे झाड उगवणे असुभ मानले जाते. घरामध्ये पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल तर ते पितृदोषाचे लक्षण मानले जाते.

यासाठी उपाय म्हणून सोमवारी पिंपळाचे झाड मुळांसह उपटून नदीत फेकून द्यावे. सोमवती अमावस्येला गरिबांना दान करा. शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करा. असं केल्याने मृत पितरं तृप्त होतात. परिणामी पितृदोषांपासून मुक्ती मिळते.

अतिविचार करणं - अतिविचार करणे कधीही चांगली गोष्ट नाही. पण जर आपण फसलो आहोत, अडकून पडलो आहोत, प्रगती खुंटत आहे असं वाटत असेल तर हा पितृदोषाचा परिणाम असू शकतो.

अशी स्थिती चंद्राच्या क्षीणतेमुळे देखील निर्माण होत असते. नियमित दिनचर्या नीट न पाळल्यास कुंडलीचा चंद्र दूषित होतो. अशावेळा शिवलिंगावर नित्य जल अर्पण करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT