ashadi wari 2023 wari taradgaon ringan culture palkhi pandharpur vitthal rukmini sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : तळपणारा सूर्य अन् रंगलेले रिंगण; माऊलींचा पालखी सोहळा तरडगाव मुक्कामाला थांबली

चांदोबाच्या लिंबाजवळ भाविकांची गर्दी, चैतन्यात वाढ

विलास काटे

तरडगाव : खांद्यावर भगव्या पताका...टाळ मृदंगाचा गजर... ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष...रांगोळ्यांच्या पायघड्या...अशा भक्तिमय वातावरणात माऊलींच्या अश्वाने मारलेली नेत्रदीपक दौड पाहून लाखो भाविकांनी कृतकृत्य झाले.

आग ओकणारा सूर्य अन् देहभान होऊन नाचणाऱ्या वैष्णवांच्या साक्षीने चांदोबाच्या लिंबाजवळील पहिले उभे रिंगण रंगले. माऊली सायंकाळी तरडगाव मुक्कामाला थांबली. लोणंदमधून दुपारी एक वाजता माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. आज पहिले उभे रिंगण असल्याने सकाळपासूनच वारकरी चांदोबाच्या लिंबाकडे जात होते.

सोहळ्यात रजिस्टर नसलेल्या दिंडीतील आणि रथापुढे चालणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लक्षणीय होती. यातील अनेक वारकरी थेट तरडगाव मुक्कामी दुपारनंतरच पोचले. रणरणत्या उन्हामुळे शेता शिवारातील वृक्षांचा वारकऱ्यांना आसरा घ्यावा लागला. दुपारी तीन सुमारास माऊलींचा रथ चांदोबाच्या लिंबाजवळ आला. रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी दुतर्फा गर्दी केली होती.तेथे राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार यांनी रिंगण लावले. यावेळी मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे उपस्थित होते.

रथ थांबताच लागलेल्या रिंगणात भोपळे दिंडीतील मानकऱ्यांनी धावण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वाराचा अश्व आला. त्या पाठोपाठ माऊलींचा अश्व धावत आला. दोन्ही अश्व रथाच्या डाव्या बाजूने मागील काही दिंड्यापर्यंत गेले. तेथून परत फिरून माऊलींच्या रथाजवळ आले. रथांत त्यांना हार, प्रसाद देण्यात आला. त्यानंतर दोन्ही अश्व एकमेकांशी स्पर्धा करीत उभ्या रिंगणातून धावत गेले. त्यानंतर त्यांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. त्यानंतर पालखी सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला.

वारी विशेष

  • ऊन असल्याने काही वारकर्‍यांनी थेट तरडगावचा मुक्काम गाठला

  • उष्णतेमुळे चांदोबा लिंब परिसरातील भाविकांची गर्दी तुलनेने कमी

  • वारकऱ्यांना टॅंकरमधून पाणी वाटप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT