Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : सतत चिडचीड होतेय? ग्रहदिशा तर फिरली नाही ना?

मानवी आरोग्यासाठी सतत चिडचीड ही अत्यंत घातक बाब

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नात कोणतंही असो राग हा प्रत्येक नात्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर राग येण्याचे प्रमाण अवलंबून असते. तुम्हाला अनेक लोक अस म्हणत असतील की,याच असच असत. हा नेहमीच चिडतो, याची समजून घेण्याची क्षमताच नाही. तर खरच तुम्हाला विचार करायला हवा. तुमचं काय चुकत हेच तुम्हाला समजत नसेल तर काय करायचे यावर आपले शास्त्र काय सांगते हे पाहुयात.

मानवी आरोग्यासाठी राग ही अत्यंत घातक बाब मानली जाते. राग‍ीट स्वभावाची परिणती हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकते. अशा स्वभावामुळे हृदयविकाराची शक्यता तीन टक्क्यांनी वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळेच त्या रागावर शास्त्रात काय उपाय आहेत ते पाहुयात.

जेव्हा तूमच्या कुंडलीतील अग्नि ग्रह त्याची ऊर्जा वाढवतो तेव्हा त्याचा दुष्परिणाम रागात होतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे व्यक्तीचा रागही कमी जास्त होतो. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ, चंद्र आणि सुर्य एकत्र येतो त्या लोकांना जास्त राग येतो. कुंडलीत मंगळ आणि गुरूसोबत चंद्र आल्यावर राग येणे सकारात्मक मानले जाते. तर, चंद्र जेव्हा केतूच्या संपर्कात येतो तेव्हा लोकांना राग येतो पण ते व्यक्त करत नाहीत.

काही लोकांना छोट्या गोष्टींवर राग राग करतात. त्या लोकांना त्यांच्या चुकीची जाणिव व्हायला हवी. आपण उगीच छोट्या गोष्टीवर रागावतो आहे हे त्यांना समजायला हवं. चूक समोरील व्यक्तीची आहे. ती ऐकत नाही. मनासारखं काही होत नाही या ना त्या कारणाने फक्त राग येतो. असे तुमच्याही बाबतीत होत असेल तर रोज सकाळी 15 मिनिट मेडिटेशन करा. राग येण्यासारखे कारण असेल तरीही शांत रहा. काहीवेळ एखाद्या तळ्याकाठी जाऊन बसा आणि राग शांत करा.शास्त्रात सांगितलेला दुसरा उपाय म्हणजे गणेश स्तोत्राचे पठण करणे. श्री गणेश हा विवेकाचा स्वामी आहे. तुम्ही जितके जास्त श्रीगणेशाची आराधना कराल तितके तुम्हाला बुद्धी प्राप्त होईल आणि तुम्हाला शांत राहाल.

ज्या व्यक्तीवर राग आहे तिला रागात काहीही समजवायला जाऊ नका. तुम्ही शांत व्हा आणि मगच बोलायला जा. राग हा एखाद्या रबर सारखा आहे. तो ताणला तर तुटतो. नात तोडायच की त्याला सांभाळायच हे तुमच्या हातात आहे.त्यामुळे तुम्हाला राग येतोय असे वाटल्यास मारूतीला शरण जा. काही मंगळवारी लाल फुले, लाल मसुराची डाळ मारूतीरायाला वहा. तसेच, चंदन टिळा लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT