Astro Tips On Depression  esakal
संस्कृती

Astro Tips On Depression : पत्रिकेतील या दोषामुळे तुम्हीही ठरू शकतात नैराश्याचे बळी, तज्ज्ञ सांगतात उपाय

चिंता, नैराश्य आता फार सामान्य शब्द झाले आहेत. पण यासाठी पत्रिकेतील दोषदेखील जबाबदार असतो.

धनश्री भावसार-बगाडे

Depression Can Happen Due To Patrika Dosh :

चिंता, काळजी, टेन्शन, नैराश्य असे शब्द हल्ली सर्रास ऐकायला मिळतात. अगदी शाळेत जाणारे मुलंही सांगतात त्यांना किती टेन्शन आहे. सध्याच्या धावपळीच्या काळात प्रत्येक जण तणावात वावरत असतो. त्यामुळे मानसिक आरोग्याची चिंता निर्माण होणे खूप सहाजिक असते.

पण लहान लहान गोष्टींनी ताण येण्यामागे किंवा नैराश्यात जाण्यामागे पत्रिकेतील काही ग्रहस्थितीसुद्धा जबाबदार असते असे खगोल अभ्यासक व देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे सांगतात.

नुकतेच देशपांडे यांनी एका व्हिडीओद्वारे पत्रिकेनुसार नैराश्य येण्यामागचे कारण आणि उपाय सांगितले आहेत. जाणून घेऊया.

पत्रिकेत नेमके काय?

पत्रिकेतील चंद्र बिघडला किंवा चंद्राची पोझिशन विक असेल तर मनुष्य पटकन फ्रस्टेट किंवा डिप्रेस होतो. चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि मनाची स्थिती यासंदर्भात चंद्राची स्थिती फार महत्वाची ठरते.

यावर उपाय काय?

ज्यांना असे दोष असतील त्यांनी हे काही खास उपाय केल्याने यातून आराम मिळू शकतो असं देशपांडे यांनी व्हिडीओत सांगितलं आहे.

  • शंखात पाणी भरून ते शंखाचे पाणी सोमवारी आंघोळीच्या पाण्यात घालावे. त्या पाण्याने स्नान करावे.

  • दर सोमवारी तांदळाचे दान एखाद्या सत्पात्री व्यक्तीला करावे.

  • यामुळे चंद्राची पोझिशन स्ट्राँग होण्यासाठी मदत होते. त्यामुळे फ्रस्टेशन, डिप्रेशनसारखे आजार पळून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT