Astro Tips
Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : मंदिराच्या आत कधीच घेऊन जाऊ नका या वस्तू; पूजा होणार नाही मान्य

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips : हिंदू धर्मात देवाचे निवास असलेले स्थान सर्वात पवित्र मानले जाते. मंदिर, धर्मशाळा, देवाची समाधी या ठिकाणी दररोज पूजा केली जाते. त्यामूळे तिथे गेल्यावर तूम्हाला प्रसन्न वाटते. मंदिरात तूम्ही जेवढ्या भक्तीने आणि पवित्रतेने प्रवेश कराल तेवढे पुण्य प्राप्त होईल, अशी समजूत आहे. पण, तूम्ही मंदिरात नकळतपणे नेत असलेल्या काही वस्तूंमूळे देवता नाराज होऊ शकतात.

मंदिर आणि उपासनेशी संबंधित अनेक नियम आहेत. ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे जाणूनबुजून किंवा नकळत अशी कोणतीही चूक करू नका. ज्यामुळे तुमची पूजा व्यर्थ होईल.

आपण सर्वजण देवाच्या दर्शनासाठी आणि पूजा करण्यासाठी मंदिरात जातो. परंतु मंदिरात चामड्याच्या वस्तूंचा प्रवेश निषिद्ध आहे. चला जाणून घेऊया दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह जी यांच्याकडून जाणून घेऊयात. लेदरच्या कोणत्या वस्तू मंदिरात नेऊ नयेत आणि याचे कारण काय आहे.

मंदिराला देवाचे निवासस्थान म्हणतात. प्रत्येकजण देवाचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी मंदिरात जातो. मंदिरात जाण्यापूर्वी, शरीर आणि मन शुद्ध करावे, म्हणजे स्नान करून आणि स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतरच मंदिरात जावे. त्याचबरोबर मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शूज आणि चप्पल, खाणेपिण्याच्या वस्तू, अशुद्ध वस्तू आणि चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवाव्यात.

मंदिरात चामड्याच्या वस्तू आणण्यास का मनाई आहे?

पर्स, बेल्ट, बॅग, टोपी, जॅकेट इत्यादी वस्तू चामड्यापासून बनवलेल्या असतात. तुम्ही या महागड्या वस्तू उच्च दर्जासाठी, फॅशनसाठी किंवा गरजेसाठी वापरत असाल तरी या वस्तू घेऊन मंदिरात प्रवेश करू नका. या वस्तू मंदिरात नेल्याने मंदिराची शुद्धता आणि पावित्र्य खराब होते.

कारण मृत प्राण्यांच्या त्वचेपासून चामडे बनवले जाते. यासोबतच यामध्ये अनेक प्रकारची रसायनेही वापरली जातात. ज्यामुळे ते दुर्गंधीहीन होऊ शकतात. याशिवाय पूजा करतानाही चामड्यापासून बनवलेल्या वस्तू घालू नयेत.

चामड्याबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे?

मृत प्राण्यांच्या कातडीपासून बनवल्या जात असल्यामुळे धार्मिकतेने चामड्याच्या वस्तू शुद्ध मानल्या जात नाहीत. तसेच, वैज्ञानिक दृष्टिकोनातून लेदर घालणे शरीरासाठी आणि त्वचेसाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे.

यामुळे रोग आणि जंतूंची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. कारण पाण्याने धुऊन लेदर साफ करता येत नाही. पाण्याच्या संपर्कात येताच लेदर खराब होते. अशा स्थितीत चामड्याच्या वस्तूंमध्ये असलेला घाम, धूळ आणि घाण यामुळे त्वचेशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT