Adopt good habbits esakal
संस्कृती

घराच्या मुख्य दारी बसाल तर धनलक्ष्मी जाईल दूर, टाळा या सवयी

लहान सहान गोष्टींवर दूर्लक्ष केल्याने आपलं मोठं नुकसानही होऊ शकतं.वास्तु शास्त्रात या लहान लहान गोष्टींचं विशेष महत्व सांगितल्या गेलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकातच काही चांगल्या आणि वाईट सवयी असतात.पण काही वाईट सवयींनी तुमच्या आयुष्यात आर्थिक वादळही येऊ शकतं.आपल्या घरातील अनेक मोठ्या व्यक्तींकडून आपल्याला अनेक वाईट सवयींसाठी टोकलं जातं.पण अनेकवेळा आपण त्याकडे दूर्लक्ष करतो.मात्र लहान सहान गोष्टींवर दूर्लक्ष केल्याने आपलं मोठं नुकसानही होऊ शकतं.वास्तू शास्त्रात या गोष्टींचं विशेष महत्व सांगितल्या गेलं आहे.

रात्री नखे कापणे, मुख्य दारी बसणे,उष्टी भांडी न घासणे या काही वाईट सवयी अनेकांना असतात.वास्तूशास्त्रात अशा अनेक सवई आर्थिक नुकसानदायक सांगितल्या गेल्या आहेत.जर तुम्हालाही अशा काही सवयी असतील तर आजच सोडा.आणि या सवयी का सोडाव्यात ते जाणून घ्या.

रात्री नखे का कापू नये ?

अनेकदा घरातले मोठे रात्री नखे कापायला टाळतात.वास्तु शास्त्रानुसार रात्री नखे कापणे अशुभ मानलं जातं.रात्री नखे कापल्याने घरात दारीद्र्य येतं आणि पैश्यांचं नुकसानही होतं.हिंदू शास्त्राच्या मान्यतेनुसार रात्री घरात लक्ष्मी माता धन आणि आशीर्वाद द्यायला दारी येते. त्यामुळे घरातल्या प्रौढ व्यक्तींकडून रात्री नखे आणि केस न कापण्याचा सल्ला दिला जातो.

मुख्य दारी का बसू नये

अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरची हवा घेण्यासाठी किंवा थंडीच्या दिवसांत उन घेण्यासाठी घराच्या मुख्य दारात बसायची सवय असते.हे देखील वास्तु शास्त्रात अशुभ मानल्या जातं.घराच्या मुख्य दारात बसल्याने आर्थिक अडचणी उद्भवू शकतात असं मानलं जातं.मान्यतेनुसार घराच्या मुख्य दारातून लक्ष्मी माता घरात प्रवेश करते.त्यामुळे घराच्या मुख्य दारात बसल्याने किंवा मुख्य दाराच्या आजूबाजूला केरकचरा ठेवल्याने लक्ष्मी मातेला राग येतो.

उष्टी भांडी का ठेऊ नये

काही लोक रात्रीची उष्टी भांडी तशीच सोडून देतात.आणि ती सकाळी धुतात.ही सवयसुद्धा वाईट मानली जाते.रात्रीची उष्टी भांडी सकाळी बघितल्यास घरी पैश्यांची तंगी उद्भवू शकते असे म्हटल्या जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT