wari ringan  sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : 'पुंडलिक वरदे'', ''ज्ञानोबा तुकाराम'' जयघोषात बेलवाडीतील पहिला गोल रिंगण सोहळा उत्साहात

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पहाटे पादुकांची पूजा झाल्यावर मार्गस्थ

राजेंद्रकृष्ण कापसे

अंथुर्णे : टाळ, मृदंगाचा गजरात… ''पुंडलिक वरदे'', ''ज्ञानोबा तुकाराम'' जयघोषात आणि सकाळच्या आल्हाददायक, चैतन्यमय वातावरणात दोन्ही अश्वांनी नेत्रदीपक तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. मोठ्या भक्तिमय वातावरणात बेलवाडीतील रिंगण सोहळा सकाळी नऊ वाजता संपन्न झाला. अंथुर्णे येथे सोहळा संध्याकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास पोचला.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पहाटे पादुकांची पूजा झाल्यावर मार्गस्थ झाला. बेलवाडी रिंगणाच्या ठिकाणी चौथरा मांडव रंगरंगोटी, फुलांच्या माळा, रंगीत कापडाने सजविला होता. रिंगणास बाहेरच्या बाजूने बांबूचे संरक्षण केले होते. चौघडा सव्वाआठला रिंगणात पोचला. त्यामागे पूर्ण सोहळा पोचला. सोहळाप्रमुख भानुदास मोरे, माजी विश्वस्त सुनील मोरे यांनी यांच्या सूचनेनुसार, चोपदार नामदेव गिराम, देशमुख चोपदार, कानसुरकर चोपदार यांनी रिंगण लावून घेतले.

संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ येताच टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत केले. संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, सोहळाप्रमुख संजय मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी रिंगणाची पाहणी केली. यावेळी, माजी मंत्री, आमदार दत्तात्रेय भरणे व शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार उपस्थित होत्या.

त्यानंतर, पखवाजाच्या बोलावर टाळकऱ्यांनी ठेका धरला. खांद्यावरून पालखी रिंगणात आणली. प्रदक्षिणा घालून पालखी मंडपात ठेवली. त्यानंतर, मेंढ्यांनी प्रदक्षिणा घातली. सोहळ्यासोबत असलेले पोलिस, होमगार्ड आणि सरकारी कर्मचारी यांनी देखील एक प्रदक्षिणा केली. त्यानंतर पताकाधारी वारकरी, पाण्याचा हंडा-तुळस घेतलेल्या महिला, विणेकरी यांनी प्रत्येकी तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या.

पवित्र सोवळी ।एक तीच भूमंडळी ।।

हा संत तुकाराम महाराजांचा सुरू होता. त्यावेळी, पेठ बाभूळकरांचा मानाचा देवाचा अश्व व मोहिते पाटील यांचा स्वाराचा अश्व रिंगणात आला. दोन्ही अश्वांनी दौड करीत तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. दोन्ही अश्व पालखीसमोर नतमस्तक झाले. ग्रामस्थांनी पालखी मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी ठेवली. दुपारी दोन वाजता सोहळा लासुर्णेकडे मार्गस्थ झाला. अंथुर्णे येथे संध्याकाळी समाजारतीनंतर मुक्कामी विसावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai-Virar : विरार पाण्याखाली! मुसळधार पावसाने रस्त्यांची झाली 'नदी’, गाड्या-घरे जलमय अवस्थेत, पाहा Video

India China Trade : अमेरिकेशी ट्रेड वॉर सुरू असताना आता भारतासाठी चीनने केली ‘ही’ मोठी घोषणा!

रहस्य, ड्रामा आणि थ्रिल... 'दशावतार'चा ट्रेलर पाहिलात का? दिलीप प्रभावळकर आणि भरत जाधवची अभिनय एकदा बघाच

Bombay High Court : ईडीच्या जप्ती आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाचा ब्रेक, अविनाश भोसले यांना दिलासा

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल!

SCROLL FOR NEXT